आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- सोन्याचे दागिने हा आज सगळ्यांचा काळजीचा विषय बनला आहे. सोनसाखळी आहे; पण चोरट्यांची भीती अन् घरात ठेवले तरी सुरक्षेची शाश्वती नाही. चोरीला गेलेले दागिने आपलेच असे सांगण्याची सोय नाही. पण, दिंडोरीतील एका दांपत्याने यावर एक भन्नाट कल्पना लढवून आपले चोरीस गेलेले दागिने रीतसर परत मिळवले. तेसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाने अर्थात फोटोने.
अलीकडे आपल्या मौल्यवान गोष्टींची कधी चोरी होईल त्याचा नेम नाही. चोरटेही नेमके चार पैसे सांभाळून असणार्या व्यक्तींच्या हालचालीवरच पाळत ठेवून योग्य वेळ निवडून चोरी करतात. शिवाय मोबाइलचा जमाना असल्याने चोरी करणार्यांकडे अनेक फंडे आहेत. मात्र, त्याच वेगवेगळ्या फंड्यांचा वापर करून आपल्या मौल्यवान वस्तूदेखील आता सांभाळता येणार असल्याचेच उदाहरण या घटनेतून पाहायला मिळाले. दिंडोरीतील नाईकवाडे दांपत्याने फोटो कॅमेर्याद्वारे आपल्याकडील सोन्याच्या दागिन्यांचे फोटो काढून ठेवले होते. केवळ सोन्याचे दागिनेच नव्हे, तर खरेदीच्या पावत्यांचे नंबर, नावासहित हे फोटो होते. कालांतराने जेव्हा त्यांच्या दागिन्यांची चोरी झाली अन् पोलिसांनी दागिने चोरांचा छडा लावून दागिने ताब्यात घेतले, तेव्हा याच फोटोच्या आधारे दागिने त्यांना परत करण्यात आले. पोलिस यंत्रणेची खात्री झाली ती याच फोटोमुळे.
आता प्रत्येकाच्याच घरी मोबाइल कॅमेरा असतो किंवा छोटे डिजिटल कॅमेरेही अनेकांकडे असतातच. त्याचाच वापर करून आपल्या चीज वस्तूंची नोंद आपण काहीही खर्च न करता करून ठेवू शकतो. एखाद्या दुकानात आपण कोणतीही महागडी वस्तू घेतली तर तिच्या बिलासह त्या वस्तूचे छायाचित्र काढून ठेवायला हवे. उदाहरणार्थ जर आपण सोने खरेदी केले तर त्या बिलाजवळ सोन्याचा दागिना ठेवून त्याचे छायाचित्र काढून ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा अशी गरज पडेल तेव्हाच फोटो काढा. अशा वेळेस आपणाला तो फोटो पोलिसांना व न्यायालयात दाखवून त्याची ओळख पटवता येते. त्यामुळे विनासायास वस्तू आपल्याला मिळते. कॅमेराचा असाच वापर आपण अनेक ठिकाणी करू शकतो. आपल्या प्रत्येक चीज वस्तूंचे फोटो काढून ठेवा. यात आपला मोबाइल, आपली प्रवासी बॅग, आगाऊ रेल्वे आरक्षण, आपली सर्व प्रकारची कामाची व गोपनीय कागदपत्रे यांचा यात समावेश करता येईल. जर तुम्ही अमुक अमुक गावाला यावेळेस होता असे जर आपल्याला कोणाला पटवून द्यावयाचे असले तर त्या गावातील महत्त्वाच्या ठिकाणी उभे राहून जरूर फोटो काढून ठेवा. यावेळेस कॅमेरामध्ये वेळेची नोंद होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.