आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोंदू पांडे बाबाच्या उत्तरप्रदेशातील अालिशान बंगल्यातून लाखांचे सोने, स्कॉर्पिओ, बुलेट जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तरप्रदेशातील हिरापूर येथून ताब्यात घेतलेली स्काॅर्पिअाे - Divya Marathi
उत्तरप्रदेशातील हिरापूर येथून ताब्यात घेतलेली स्काॅर्पिअाे

नाशिक- प्रतिष्ठित कुटूंबाला सुमारे १५ पंधरा लाखांचा गंडा घालणाऱ्या उदयराज पांडेच्या उत्तरप्रदेशातील मूळगाव हिरापूर येथील अालिशान बंगल्यातून पाेलिसांनी सुमारे लाखांचे सोने, स्काॅर्पिअाे आणि बुलेट असा ऐवज़ जप्त केला अाहे. सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने जोहनपूर येथे ही धडक कारवाई केली. संशयिताने भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालत लाखोंची माया जमवली असल्याचे तपासात पुढे येत आहे. 


पाच दिवसांपूर्वी वागणी (अंबरनाथ) येथे भोंदूबाबाच्या घरी सरकारवाडा पाेलिस आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पथकाने संयुक्त झडती घेतली असता या भाेंदूबाबाचे मुळगाव उत्तरप्रदेशातील हिरापूर हे असल्याची माहिती मिळाली हाेती. यानुसार उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरकावाडा पोलिस ठाण्याचे पथक तेथे पाठवण्यात आले. पथकाने पांडेच्या घरी झडती घेतली. त्याच्या घरासमोरील स्कॉर्पिओ बुलेट जप्त करण्यात अाली. परिसरात अधिक चौकशी केले असता जोहनपूर येथील एका सराफाकडे सुमारे लाखांचे सोने त्याने विक्री केल्याची माहिती मिळाली. पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सराफाकडून सोने जप्त केले. उपायुक्त पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पंकज पळशीकर, रवींद्र पानसरे, सुनिल जगदाळे, दीपक खरपडे, पंकज महाले यांनी ही कारवाई केली. 


भाेंदूगिरीतून जमवली माया 
संशयितानेभाेंदूगिरीतून लाखोंची माया जमवली आहे. अंबरनाथ येथे वास्तव्यास राहून तो परिसरातील प्रतिष्ठित मंडळींना आपल्या भोंदूगिरीच्या पाशात अडकत त्यांचे वशीकरण करुन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला. जमवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करून ताे जमीन खरेदी करत असे. तसेच अन्य ठिकाणी गुंतवणूक करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...