आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांनी साधला सुवर्ण खरेदीचा मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चांदी खरेदीचे महत्त्व असलेल्या धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी चांदी, चांदीच्या वस्तू अाणि चाेख साेने साेन्याचे दागिने यांची मनपसंत खरेदी केल्याने सराफी पेढ्यांना झळाळी अाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. ‘धनाने धन वाढते’ या चालत अालेल्या उक्तीप्रमाणे शहरवासीयांनी खऱ्या अर्थाने ‘धन’संचयाची अापली परंपरा या मुहूर्तावरही कायम राखल्याचे चित्र शुक्रवारी शहरात पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, याचवर्षी ३१ हजारांवर गेलेले साेन्याचे दर शुक्रवारी ३०,१०० रुपयांच्या अासपास राहिल्याने खरेदीची ही नामी संधी शहरवासीयांनी साधली. चांदीबराेबरच चाेख साेने दागिन्यांनाही चांगली मागणी हाेती, असे सराफी व्यावसायिकांनी सांगितले.
धनत्रयाेदशीच्या दिवशी चांदी खरेदीचे तिच्या पूजेचे विशेष महत्त्व असते. यामुळेच शुक्रवारी सराफी पेढ्यांत चाेख चांदी, चांदीचे पूजासाहित्य चांदीची ताट-वाटी, पेले यांसारख्या वस्तू खरेदीला नाशिककरांनी पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. वर्षातील साेने-चांदी खरेदीचे जे माेजके मुहूर्त अाहेत, त्यापैकी धनत्रयाेदशी हा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त मानला जाताे नाशिककर या मुहूर्तावर साेने खरेदी करतातच, अशी परंपरा यंदाही पाहायला मिळाली. शहरातील विविध सराफी पेढ्यांनी दिलेल्या अाकर्षक अाॅफर्समुळेही ग्राहकांना अाकर्षित केल्याचे दिसले.
मुहूर्तावरील खरेदी म्हणून चाेख साेन्याची खरेदी तर ग्राहकांनी केलीच, शिवाय सुरू हाेणार असलेल्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांची खरेदी देखील माेठ्या प्रमाणावर झाली.

असे हाेते साेन्याचे दर
शहरातील सराफी पेढ्यांत चाेख साेन्याचे प्रति दहा ग्रॅमकरिताचे दर जवळपास ३०,१०० रुपये हाेते. या मुहूर्तावर चांदी खरेदीला जास्त महत्त्व असल्याने चांदीलाही चांगली मागणी राहिली. चांदीचा दर प्रति किलाेकरिता जवळपास ४४,००० रुपये इतका हाेता. ^जास्तलाेकांचादागिने खरेदीकडे कल हाेता. नेकलेस, कंगण यांसह चाेख साेन्यालाही मागणी राहिली. अामच्याकडे अाम्ही दिलेल्या अाकर्षक याेजनेनुसार साेने खरेदीबराेबर गाडी जिंकण्यासाठी ग्राहक अापले नशीब देखील अाजमावत अाहेत. -महेश अाडगावकर, सराफी व्यावसायिक

चांदीच्या वस्तूंना चांगली मागणी
^धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावरचांदी खरेदीला विशेष महत्त्व असते. यामुळे चांदीचे शिक्के, भांडी, पूजासाहित्य अशा वस्तूंना चांगली मागणी हाेती. ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम हाेता. -मिलिंद दंडे, सराफी व्यावसायिक
बातम्या आणखी आहेत...