नाशिक - इंदिरानगरजॉगिंग ट्रॅक परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र खेचून पलायन करणाऱ्या संशयितास नागरिकांनी भद्रकाली परिसरात बीटमार्शल पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून पकडले. एक संशयित फरार झाला. साेमवारी दुपारी वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
वैशाली मुळे (वय ६२) या नातीला शाळेत सोडण्यास जात असताना, पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हावरून आलेल्या दोन संशयितांनी पाठीमागून त्यांना धक्का देत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून भरधाव वेगाने पलायन केले. काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. संशयित दुचाकी आणि संशयितांचे वर्णन वायरलेसवर कळवण्यात आल्यानंतर पोलिस हद्दीत सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली. संशयित वाहन भद्रकाली परिसरात असल्याचा संदेश भद्रकाली बीटमार्शल दत्तात्रय खैरे, सुरेश घारे यांना मिळाला. त्यांनी तत्काळ संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. बागवानपुरा भागात सिनेस्टाईल पाठलाग करून एका संशयितास पकडण्यात नागरिकांसह पोलिसांना यश आले. चौकशीमध्ये शाहरुख अजीम सय्यद (रा. बागवानपुरा) असे त्याचे नाव िनष्पन्न झाले. अन्य संशयित मुद्दसर अन्सारी गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. संशयितास इंिदरानगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पकडण्यात आलेला सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची नोंद शहरातील पोलिस ठाण्यांत आहे.
नागरिकांची वेळीच याेग्य ती मदत झाली तर पाेिलसांना गुन्हेगारी प्रवृत्तींना सहज अाळा घालता येईल, असे या घटनेनंतर बाेलले जात अाहे.