आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्डविंग बाइक’चे झाले नाशिककर दिवाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-नाशकातील रस्त्यावरून ‘ती’ धावू लागली अन् प्रत्येक बाइकप्रेमीसह सामान्य नागरिकही नजरा विस्फारून एकटक पाहत राहिले. खास अमेरिकेतून मागवलेल्या, थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल 65 लाखांच्या ‘गोल्डविंग बाइक’चा तोरा पाहून सारेच तिच्या प्रेमात पडले. नाशिककरांची अवस्था ‘परी म्हणू की अप्सरा.. अशीच झाली होती. रस्त्यावरून जाणार्‍या बाइकचा अक्षरश: पाठलाग करण्यात येत होता. प्रत्येकालाच या अद्वितीय दुचाकीची माहिती हवी होती. तिच्या खुब्या जाणून घेण्याची, धावत्या गाडीतून अन् मध्येच थांबूनही मोबाइलवर तिचे फोटो काढण्याची जणू स्पर्धाच दिवसभर सुरू होती. गाडी जवळून पाहण्यासाठी किंवा काही ठिकाणी थांबलेल्या गाडीसमवेत आपले छायाचित्र काढण्यासाठी नाशिककर आबालवृद्धांची झुंबड उडत होती.
विशेष हेल्मेटमुळे वायरलेस कम्युनिकेशन : या बाइकबरोबरच्या विशेष हेल्मेटमध्ये वायरलेस कम्युनिकेशन सुविधा आहे. त्यामुळे बाइकवर मागे बसणार्‍या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी मान मागे वळवण्याची गरज पडत नसल्याने रस्त्यावरील लक्ष विचलित होत नाही.
थेट सॅटेलाइटद्वारे कंपनीकडून मदत : बाइकला जगात कुठेही काहीही झाले आणि चालकाचा मोबाइल बंद असला तरी थेट सॅटेलाइटद्वारे त्याचा संदेश संबंधित कंपनीला मिळतो. त्यामुळे त्याच जागेवर कंपनी बाइकसाठी आवश्यक ती मदत त्वरित पुरवू शकते.