आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हवे प्रयत्न- सुनील अं‍बेकर यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जागतिकीकरणाच्या काळात विद्यार्थ्यांना कौशल्य नसल्याने संधी मिळत नाही. त्यामुळे सर्वांगीण विकास करण्यासाठी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याची गरज असून त्यात राष्ट्राविषयीची महापुरुषांविषयीचा अंतर्भाव असायला हवा.
स्वस्त गुणवत्तापूर्ण शिक्षण हा प्रत्येक घटकाचा हक्क असल्याने यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील अंंबेकर यांनी येथे केले. गंगापूररोड येथील शंकराचार्य संकुल सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिक शाखेचे सुवर्ण जयंती संमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थी परिषदेच्या कार्याचा आढावा घेत त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, देशातील सर्वात जास्त युवकांचे संघटन असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेल्या ५० वर्षांत केवळ विद्यार्थ्यांचेच प्रश्न सोडविले नाही, तर समाजाच्या सर्वांगीण विकासात विद्यार्थी परिषदेचे मोठे योगदान राहिले. समाजातील मागास वर्गाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी स्वस्त गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेची गरज आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते. तीन सत्रांमध्ये विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थी हिताला प्राधान्य
परिषदेने आरोग्य विज्ञान विद्यापीठावर झेंडा रोवला. प्लास्टिक मुक्ती अभियान राबविले जाईल. योगेशशिरसाठ, महानगर मंत्री
मनुष्यनिर्माणाचा वसा
सन१९६४ ७४ मध्ये नाशिकमधील विद्यार्थी परिषदेने आपल्या विस्तार वाढविण्यास सुरुवात केली. मनुष्यनिर्माणाचाच वसा हाती घेतला. - वसंत जोशी

अभाविपचा चढती कमान-
अभाविपची देशभरात यंदा सर्वाधिक तब्बल ३० लाख सदस्य नोंदणी.
महाराष्ट्रात ३४ पूर्णवेळ कार्यकर्ते.
२१ जिल्ह्यांत मेळावे, २० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयक आविष्कारांचे नाशिकमध्ये ते ११ मार्च दरम्यान डिपेक्स प्रदर्शन सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर यंदा राबविणार प्लास्टिक मुक्ती अभियान
सात तालुक्यांत सदस्य नोंदणी अभियानात हजार सदस्यांची नोंदणी.