आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Golden Jubilee: Shiv Sena Starts Abhay Yojana For Newborn Girls

सुवर्णमहाेत्सवी वर्ष: शिवसेनेतर्फे नवजात बालिकांसाठी ‘अभय याेजना’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिवसेनेच्या स्थापनेला १९ जून २०१५ राेजी ५० वर्षे पूर्ण हाेत असल्याचे अाैचित्य साधून शिवसेनेने चांद्यापासून तर बांद्यापर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे अायाेजन केले असून, यात सर्वात लक्षवेधी म्हणजे शिवसेनेची नवजात बालिकांसाठी ‘अभय याेजना’ ठरणार अाहे.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी १९ जून १९६६ राेजी शिवसेनेची स्थापना झाली. १९ जून २०१५ मध्ये शिवसेना पन्नाशीत पाेहाेचणार असून, या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला अाहे. या सुवर्णमहाेत्सवी वर्षात पक्षातर्फे भरगच्च कार्यक्रम हाेणार असून, त्याचे नियाेजन करण्यासाठी मंगळवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यात प्रामुख्याने शिवसेना ‘अभय योजना’ राबवणार असून, १८ जून २०१५ रोजी रात्री १२ वाजेपासून १९ जून २०१५ रात्री १२ वाजेपर्यंत जन्मलेल्या १०० मुलींच्या नावाने नाशिक महानगरच्या वतीने १८ वर्षांकरिता प्रत्येकी ५००० रुपयांची ठेव मुलींच्या नावे बँक खात्यात ठेवण्यात येणार आहे. स्त्रीभ्रूण हत्येच्या पार्श्वभूमीवर जन्माला येणा-या मुलींना आधार मिळावा भविष्यात त्यांना स्वावलंबी होण्यासाठी त्याचा उपयाेग हाेईल, असे बाेरस्ते यांनी यावेळी सांगितले. याबराेबरच शिवसेना ‘नाशिकभूषण’ सन्मान सोहळा हाेणार असून, यामध्ये गेल्या ५० वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी करणा-या सामाजिक संस्था, बँका, शैक्षणिक संस्थांना हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे ५० वर्षांपासून विशेष सामाजिक काम करणा-या महिलांनासुद्धा याच पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त शहरातील सर्व प्रभागांमध्ये शिवसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहेत. महिला आघाडीच्या वतीने शहरातील प्रमुख महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन केले जाणार अाहे. शहरातील रस्त्यांसाठी हाेणा-या वृक्षताेडीवरून चांगलेच राजकारण तापले अाहे. रस्ता रुंदीकरणासाठी हाेणा-या वृक्षताेडीमुळे पर्यावरणाचे ढासळते संतुलन ही माेठी समस्या अाहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नाशिक महानगरातील काही प्रमुख कॉलनीरोड डी.पी. रोड निवडून येथे आकारानुसार विशिष्ट जातींच्या वृक्षांची लागवड देखभाल केली जाणार आहे. यातून पर्यावरणाचा समताेल राखण्याबराेबरच शहराच्या सौंदर्यातही भर पडणार अाहे.

या बैठकीला शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, देवानंद बिरारी, शशिकांत कोठुळे, सुभाष गायधनी, श्यामला दीक्षित, योगेश बेलदार, संजय गायकर, भागवत आरोटे, महेंद्र पोरजे, संतोष कहार, नीलेश कुलकर्णी, नितीन चिडे, भूपती आव्हाड, संजय थोरवे, आशिष साबळे, चेतन शेलार, श्याम कंगले, योगेश देशमुख, संदीप ढिकले, गौरव वाघ, गणेश थेटे, श्रद्धा जोशी, मंदाकिनी जाधव, शुभांगी नांदगावकर, अनिता पाटील आदी उपस्थित होते.

नावीन्यपूर्ण उपक्रमांचे अायाेजन
शिवसेनेच्यासुवर्णमहाेत्सवी वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने नाशिक शहरात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असेल. त्यात विविध क्षेत्रांतील पन्नास गुणवंतांचा सन्मान करण्यात येणार अाहे. नवजात बालिकांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील अशा ठेवीही ठेवल्या जातील. तसेच, ५० वर्षांपासून सामाजिक कार्य करणा-या महिलांचाही सन्मान केला जाणार अाहे. अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना