आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवल्यातील पंकज पारख यांनी बनविला चार किलो सोन्याचा सव्वा कोटीचा शर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला- पहिल्या इयत्तेत जातानाच बोटात सोन्याची अंगठी आणि गळ्यात सोनसाखळी घालून जाणारा. एरवी रोजही सुमारे पावणेदोन किलो सोन्याचे दागिने अंगावर घालून वावरणारे येवल्यासारख्या ग्रामीण भागातील पंकज पारख हे पुन्हा एकदा हौसेला मोल नसते हे दाखवून देणार आहेत. येत्या 8 ऑगस्टला आपल्या 45व्या वाढदिवशी ते चक्क चार किलो सोन्यापासून तयार केलेला सव्वा कोटीचा शर्ट परिधान करणार आहेत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये याची नोंद होण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. यापूर्वी गोल्डमॅन म्हणून चर्चेत आलेले दोघेही महाराष्ट्रातीलच आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वर्गीय आमदार रमेश वांजळे हे अशाच रीतीने दागिन्यांमुळे ‘गोल्डमॅन’ म्हणून यापूर्वी परिचित झाले होते. त्यापाठोपाठ पुण्यातीलच दत्ता फुगे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोन्याच्या शर्टमुळे देशभरात प्रसिद्ध झाले. 3 किलो 200 ग्रॅम सोन्याचा शर्ट व 300 ग्रॅम सोन्याचा पट्टा असा साडेतीन किलो सोन्याचा पेहराव करून फुगे यांनी विक्रम नोंदविला होता. त्यांचा हा विक्रम येवल्यातील पारख मोडणार आहेत. 3 किलो 900 ग्रॅम वजनाचा शर्ट, सोन्याचा पट्टा, सोन्याची फ्रेम असलेला चष्मा आणि चांदीचे बूट पारख आपल्या वाढदिवसानिमित्त परिधान करतील. त्याबरोबरच त्यांच्या अंगावर पूर्वीपासून असणारे पावणेदोन किलोचे सोन्याचे दागिनेही असतील. त्यामुळे सुमारे साडेपाच ते सहा किलो सोने परिधान करून ते सर्वात मोठे ‘गोल्डमॅन’ ठरण्याचा विक्रम नोंदविण्याच्या तयारीत आहेत.
विशीतच नगरसेवक : पारख वयाच्या विशीतच नगरसेवक झाले. राजकारणाबरोबरच समाजकारणाचा वारसा जोपासणार्‍या पारख यांनी सहकार व शिक्षण क्षेत्रातही कार्याचा ठसा उमटविला आहे. सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, येवला र्मचंट्स बँकेचे अध्यक्ष, येवला नगरपालिकेचे ते उपाध्यक्ष आहेत. प्रभारी नगराध्यक्षपदाची धुराही त्यांच्याकडे योगायोगाने वाढदिवसाच्या दिवशीच सोपविली जाणार आहे. मित्रपरिवारासह स्व. सुभाषचंदजी पारख सहकारी पतसंस्थेने या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाचे नियोजन केले आहे.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...