आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायामप्रेमी जाॅगर्सचे अाराेग्य ‘धुळीत’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातीत सर्वात मोठा प्रशस्त जाॅगिंग ट्रॅक गाेल्फ क्लब मैदानावर अाहे. या ठिकाणी सकाळ सायंकाळी जाॅगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही माेठी अाहे. यात तरुणांसह महिला, बालक अन‌् ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असताे. विशेष म्हणजे, उच्च पदस्थ अधिकारी, खेळाडू, व्यायामप्रेमी यांचा या ठिकाणी राेजच वावर असताे. मात्र, तरीदेखील या जाॅगिंग ट्रॅकच्या देखभाल-स्वच्छतेकडे अपेक्षित प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याने जाॅगर्सना गैरसाेयींचा सामना करावा लागत अाहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘दिव्य मराठी’ने येथील अस्वच्छतेच्या समस्येवर प्रकाश टाकला हाेता. त्यानंतर अाता या ठिकाणी जाॅगिंग ट्रॅकच्याच कडेला खेळल्या जाणाऱ्या फुटबाॅल वा अन्य खेळांमुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास जाॅगर्सला सहन करावा लागत असल्याने याेग्य त्या उपाययाेजना करण्याची मागणी हाेत अाहे. निराेगी स्वास्थ्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या अाराेग्याला या धुळीमुळे माेठ्या प्रमाणावर धाेका असल्याने संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे बनले अाहे. मात्र, या जाॅगिंग ट्रॅकच्या देखभालीची, तसेच ट्रॅकसंबंधी कामांची जबाबदारी विभागावर निश्चित करण्यात अाली नसल्यामुळे तक्रार केल्यास संबंधित विभागांकडून केवळ एकमेकांकडे बोट दाखविले जाते. परिणामी, गेल्या कित्येक दिवसांपासून जाॅगर्सना या समस्यांचा सामना करावा लागत अाहे.
प्रतिबंध अन् शिस्त हवी
गाेल्फ क्लब हे शहरातील सर्वाधिक सुस्थितीतील मैदान आहे. या ठिकाणी रोजच शेकडाे खेळाडू व्यायाम, खेळासाठी येत असतात. मात्र, कुठलाही खेळ खेळताना ताे कोणत्या ठिकाणी खेळावा, इतरांना त्यामुळे त्रास हाेणार नाही, मैदानाचे नुकसान हाेणार नाही, याबाबत खेळाडूंनी विचार करणे गरजेचे अाहे. पालिका प्रशासन, तसेच मैदानाची देखरेख करणाऱ्यांकडूनदेखील याबाबत प्रतिबंध घालण्यात यावा, जेणेकरून खेळाडूंना शिस्त लागेल अन् अन्य नागरिकांना कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही.

नियमित स्वच्छतेचा अभाव
याट्रॅकवर गेल्या अनेक दिवसांपासून झाडांचा पालापाचोळा पडून असल्याने दुर्गंधी पसरली असल्याची बाब यापूर्वीदेखील ‘डी. बी. स्टार’च्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास अाणून देण्यात अाली हाेती. मात्र, अद्यापदेखील नियमित स्वच्छता केली जात नसल्याने हीच स्थिती कायम असल्याचे ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

बास्केटबाॅल मैदानावर क्रिकेट
गोल्फ क्लब मैदानावर असलेल्या बास्केटबॉल मैदानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कुणीही या ठिकाणी वाट्टेल ताे खेळ खेळताे. त्यामुळे या मैदानाचीही वाताहत झाली अाहे. अनेकदा या ठिकाणी क्रिकेटचेच डाव रंगत असल्याने बास्केटबॉलपटूंनी नाराजी व्यक्त केली अाहे. तसेच, या मैदानाच्या देखभालीकडे लक्ष देण्याची मागणीही अनेक खेळाडूंनी ‘डी. बी. स्टार’कडे केली आहे.

सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी
गोल्फ क्लब मैदानावर वाढता टवाळखाेरांचा वावर धाेकादायक ठरू लागला अाहे. तासन‌्तास वावरणाऱ्या या टवाळखाेरांमुळे व्यायाम वा जाॅगिंगसाठी येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण हाेताे. मैदानावरील व्यायाम साहित्याचेही नुकसान हाेत असल्याने त्यावर देखरेखीसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकाेनातून या ठिकाणी महापालिका प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी अनेकांनी केली हाेती. मात्र, अद्यापदेखील त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.
फुटबाॅल खेळाडूंनी स्वखर्चातून लावलेल्या जाळीची अशाप्रकारे दुरवस्था झाल्याने थेट ट्रॅकवर फुटबाॅल येत असल्याच्या तक्रारी अाहेत.

नियमित पाणी मारणे गरजेचे
गोल्फक्लबच्या जाॅगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणी मारले जात नसल्याची बाब ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाली. परिणामी, नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत अाहे. ट्रॅकबराेबरच ज्या ठिकाणी फुटबाॅल वा अन्य खेळ खेळले जातात, तेथेदेखील पाणी फवारणे गरजेचे अाहे. जेणेकरून जाॅगर्सचे अन‌् खेळाडूंचेदेखील अाराेग्य धाेक्यात येणार नाही. सुनील खुने, शहरअभियंता, महापालिका

या उपाययोजना

{जाॅगिंग ट्रॅकवर, तसेच मैदानावर सकाळ, सायंकाळी पाणी मारण्यात यावे.
{ जाॅगिंग ट्रॅकपासून याेग्य त्या अंतरावरच फुटबॉल, क्रिकेट खेळण्याबाबत खेळाडूंना सूचना कराव्यात.
{ जाॅगिंग ट्रॅकलगत ग्रीन शेड लावण्यात यावी, जेणेकरून जाॅगर्सना बाॅल लागणार नाही.
{ सुरक्षितेच्या दृष्टीने मैदानावर कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात यावी.
{ मैदानावर, तसेच जाॅगिंग ट्रॅक परिसरात िनयमित स्वच्छता करण्यात यावी.

प्रशासनाने लक्ष द्यावे
^जाॅगिंगट्रॅकलगतचखेळल्याने जाॅगर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. - रेखा देशमुख

धुळीमुळे प्रचंड त्रास
^जाॅगिंग ट्रॅकच्या शेजारी फुटबॉल खेळला जात असल्याने जाॅगिंग करताना प्रचंड धुळीचा सामना करावा लागतो. - ज्योती सोनी, नागरिक

दुखापतीपासून बचावले
^जाॅगिंग ट्रॅकवरूनजात असताना अचानक वेगाने फुटबॉल अंगावर आला. या घटनेत मोठी दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावले. - सुषमा इंगळे

स्वच्छ हवा मिळते कुठे...?
^स्वच्छ हवा अन‌् निराेगी अाराेग्यासाठी जाॅगिंग ट्रॅकवर येताे. मात्र, या ठिकाणी पाणी मारले जात नसल्याने धूळ उडते अन‌् अाराेग्य धाेक्यात येते. -रघुनाथ परदेशी

धुळीमुळे हाेताे प्रचंड त्रास
^जाॅगिंगट्रॅकच्या शेजारीच फुटबॉल, क्रिकेट खेळले जात असल्याने प्रचंड धूळ उडते. यामुळे नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्न निर्माण हाेत अाहे. - श्रीकांत सोनी, नागरिक

याेग्य व्यवस्था करण्यात यावी
^फुटबॉल खेळण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावरच अन्य ठिकाणी महापालिका प्रशासनाने व्यवस्था करून द्यावी. जेणेकरून इतरांना त्रास हाेणार नाही. - नीलराज जैन

गेल्या दोन वर्षांपासून खेळताेय
^आम्ही दाेनवर्षांपासून येथे फुटबॉल खेळताे. खेळताना धूळ उडू नये, यासाठी आम्ही स्वत:च नियमित पाणीदेखील मारताे. अली पंजवाणी, खेळाडू

स्वखर्चातून नेट लावली
^जाॅगिंग ट्रॅकवर येणाऱ्या नागरिकांना फुटबॉल लागू नये, यासाठी अाम्ही स्वखर्चातून नेट लावली आहेे. नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतो. - जहीर शाकीर, खेळाडू