आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Good Days Are Coming Discuss In Nashik Bjp Party, Divya Marathi

शहर भाजपचे! ‘अच्छे दिन आ गये..’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकेकाळी पराभवासाठीच निवडणूक लढवावी लागणार्‍या भाजपला नाशिक शहरातही मोदी लाटेमुळे ‘अच्छे दिन’ आले असून, अन्य पक्षांतील बडी मंडळी आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे. या चर्चांमधील तथ्यांशाबाबत शंका आहे; मात्र या चर्चाच भाजपच्या लाटेला बळकटी देतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राजकीय क्षेत्रात हवेच्या दिशेने नेत्यांची भाऊगर्दी होत असल्याचा अनुभव तसा जुनाच. त्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जाण्यासाठी अन्य पक्षांतील नेत्यांची गर्दी झाल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगतात. गेल्या निवडणुकीत युतीने शहरातील चार मतदारसंघांची अंतर्गत वाटणी करून घेतली होती. त्यात मध्य आणि देवळाली मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला; तर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यात आला होता. हीच समीकरणे यंदाही कायम राहण्याच्या शक्यतेने आता सेनेतील काही मंडळी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यांच्या नावाची पूर्व मतदारसंघात चर्चा
पूर्व विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचे आमदार उत्तम ढिकले यांचीच चर्चा सुरू आहे. सध्या मनसेचे शहराध्यक्षपद त्यांचे पुत्र अँड. राहुल ढिकले यांना दिले असले तरीही पक्षांतराच्या शक्यतेची चर्चा मात्र थांबायला तयार नाही. पंचवटी आणि नाशिकरोड भागातील मराठा समाजातील मतदारांचा विचार करून मनसेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे मावळते सभापती रमेश धोंगडे वा हेमंत गायकवाड यांनाही भाजपचे निमंत्रण मिळू शकते. पूर्वार्शमीचे भाजपचेच व आता अपक्ष नगरसेवक असलेले संजय चव्हाण हेदेखील ऐनवेळी स्वगृही परततील, असे बोलले जात आहे. अर्थात, राजकारणात ऐनवेळी पत्ते खुले करण्याची पद्धत रूढ असल्याने निवडणुकीच्या वेळी आणखी काही दिग्गज स्वपक्षाला धक्का देऊ शकतात.

पश्चिमला यांची चर्चा
पश्चिम मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. राहुल आहेर हे उमेदवार होते. यंदा मात्र डॉ. आहेरांनी चांदवडकडे मोर्चा वळविल्याचे कळते. युतीत या जागेवरून अँडजेस्टमेंट न झाल्यास भाजपकडून सेनेचे नगरसेवक तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर वा नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांचाही विचार होऊ शकतो. तर, मनसेचे सभागृहनेते शशिकांत जाधव हेदेखील ऐनवेळी भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशी सध्या शहरात चर्चा आहे.