आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करून दर्जेदार शिक्षण द्या- एस. बी. पंडित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- अद्ययावत साधने, तंत्राद्वारे उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आवाहन गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस. बी. पंडित यांनी केले.

बिटको महाविद्यालयातील दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सनदी लेखापाल मुकूंद कोकीळ, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, समन्वयक डॉ. डी. जी. बेलगावकर, उपप्राचार्य डॉ. अंजली गौतम, प्रा. सुरेंद्र घाटपांडे, प्रा. सी. एस. गायकवाड आदी उपस्थित होते.

‘इनोव्हेटिव्ह अँप्रोचेस इन टिंचिंग’ व ‘मेकींग द टिचिंग लर्निग प्रोसेस मोअर इफेक्टिव्ह’ या विषयावर अनुक्रमे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका प्राची राठी व प्रा. एस. एम. चपळगावकर यांनी मार्गदर्शन केले. दुसर्‍या दिवशी प्रा. प्रकाश लांडगे, प्रवीण जोशी, राजेंद्र वडनेरे, प्रा. नरेश पाटील, डॉ. डी. जी. शिंपी, प्रा. नीता कुलकर्णी, डॉ. चित्रा म्हाळस, डॉ. एस. आर. गायकवाड, स्वाती दुबे, श्योन्ती तलवार, वंदना शेवाळे आदींसह 30 प्राध्यापकांनी दृकर्शाव्य माध्यमाद्वारे पेपर प्रबंध सादर केले.

चर्चासत्रास प्रा. संजय मिरजकर, प्रा. नरेश पाटील, प्रा. अशोक धुळधुळे, सी. एस. गायकवाड, शोभा त्रिभुवन, सायली असनारे, वाय. डी. काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजया धनेश्वर यांनी केले.

67 प्राध्यापकांचे प्रबंध सादर
दोनदिवसीय चर्चासत्रात 147 प्राध्यापकांनी सहभाग घेतला, तर 67 प्राध्यापकांनी पेपर प्रबंध सादर केल्याची माहिती प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी दिली. तसेच, आगामी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या चर्चासत्राबाबतही डॉ. कुलकर्णी यांनी माहिती दिली.