आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालविवाहमुक्त जिल्ह्याकडे नाशिकची वाटचाल; लग्नसराईत अवघ्या दाेनच तक्रारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी वाढलेली जागरूकता, कायद्याची हाेणारी कठाेर अमलबजावणी, गावांमध्ये नियुक्त ग्रामसमित्या, ग्राम बालसंरक्षण समित्या अाणि समुपदेशकांनी  बजावलेली चाेख भूमिका... यामुळे ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ हाेण्याकडे नाशिकची वाटचाल सुरू झाली अाहे.
 
अाजवरचा अनुभव लक्षात घेता सर्वाधिक तक्रारी मार्च अाणि एप्रिल महिन्यात येतात. यंदा मात्र महिला अाणि बालकल्याण विभागाकडे केवळ दाेनच तक्रारी अाल्या आहेत. तर, बालविवाह राेखण्याचे प्रभावी काम करणाऱ्या ‘चाईल्ड लाईन’कडे एकही तक्रार प्राप्त झालेली नाही.

महाराष्ट्रात १०० पैकी तब्बल २५ मुलींचे बालविवाह हाेत असल्याची धक्कादायक बाब राष्ट्रीय काैटुंबिक अाराेग्य सर्वेक्षणात काही वर्षांपूर्वी अाढळून अाली हाेती. बालविवाह राेखण्यासाठी सरकारी पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न हाेत अाहेत. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बालविवाहांचे प्रमाण कमी असले तरीही येथे हाेणारे बालविवाह राेखण्यात पूर्णत: यश अालेले नाही. अाजही शहरातील झाेपडपट्टी भागात, तसेच ग्रामीण भागात राजराेसपणे बालविवाह हाेत अाहेत. बालविवाह राेखण्यासाठी शासनस्तरावर कमालीचे प्रयत्न हाेत असले तरीही या प्रथेचे उच्चाटन करण्यास राज्य सरकारला यश येताना दिसत नव्हते.

नाशिकमध्येही बालविवाहांचे प्रमाण लक्षणीय असल्याने यापुढील काळात ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ करण्याचे अादेश जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी व बालकल्याण समिती यांना महिला व बालविकास विभागाचे राज्याचे अायुक्त डाॅ. के. एम. नागरगाेजे यांनी गेल्या वर्षी दिले हाेते. यासाठी ग्रामीण भागात ग्राम समित्या कार्यरत करण्यात अाल्या असून, शहरात प्रभाग समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.
 
अाजवर झालेली जनजागृती अाणि ग्रामसमित्या यामुळे असे विवाह वेळीच राेखले गेल्याचे समाेर अाले अाहे. विवाहांच्या मोसमात अर्थात मार्च, एप्रिल अाणि मेमध्ये बालविवाहांचे प्रमाण सर्वाधिक असायचे. सर्वाधिक तक्रारी एप्रिलमध्ये प्राप्त व्हायच्या. यात बहुतांश तक्रारी चाइल्डलाइन संस्थेकडे येत. यंदा मात्र अाजवर एकही तक्रार अालेली नाही. बालकल्याण अधिकाऱ्यांकडेही दाेनच तक्रारी अाल्या असून, दाेन्ही विवाह राेखण्यात त्यांना यश अाले अाहे.

बालविवाहापासून परावृत्त हाेईपर्यंत प्रयत्न
बालविवाहांची माहिती मिळण्यासाठी अाणि असे विवाह राेखण्यासाठी राज्य सरकारला चाइल्ड लाइन संस्थेची माेठी मदत हाेत अाहे. बालविवाहांची माहिती चाइल्ड लाइनकडून मिळाल्यानंतर संस्थेचे स्वयंसेवक प्रत्यक्ष मुलीच्या व मुलाच्या कुटूंबियांशी भेट घेतात अाणि त्यांचे समुपदेशन करतात. तसेच, त्यांना कायदा समजावून सांगतात. बालविवाह करण्यापासून संबंधित कुटूंब परावृत्त हाेईपर्यंत या संस्थेचे स्वयंसेवक माघारी फिरतच नाहीत.
 
..तर हाेताे तुरुंगवास
बालविवाहासंदर्भातील गुन्हे दखलपत्र आहेत. याचाच अर्थ पोलिसांकडे त्याविषयी तक्रार नोंदविल्यास न्यायालयाच्या आदेशाशिवायदेखील पोलिस अटक व तपास करू शकतात. म्हणून बालविवाहाचा गुन्हा घडत असेल किंवा घडला तर पोलिसांकडे तक्रार नोंदविणे गरजेचे आहे. न्यायालयाचा मनाई हुकूम निघाल्यानंतरही बालविवाह झाला तर, मनाई हुकूम मोडणाऱ्यास ३ महिने कैद व १००० रुपये दंड अशी शिक्षा होते.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा,
- बालविवाहाची कारणे
- यंदा असे राेखले गेले बालविवाह
- या केल्या जातात उपाययाेजना
- बालविवाहाच्या प्रकरणात शिक्षा काेणाला हाेते?
- बालविवाह राेखण्यासाठी या तालुक्यांकडे सर्वाधिक लक्ष
- चाइल्ड लाइनने राेखले हाेते अाठ विवाह
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...