आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकजवळ मालगाडीचे 20 डबे घसरले; गोदावरी, पंचवटी एक्स्प्रेस रद्द

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: नाशिकपासून जवळ असलेल्या पाडळीदरम्यान मालगाडीचे 20 डबे गुरुवारी घसरल्यामुळे नाशिक- मुंबईदरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पंचवटी एक्सप्रेस आणि गोदावरी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मालगाडीचे डबे हटविण्याचे काम सुरु असून वाहतूक पूर्ववत होणास काही वेळ लागेल, अशी माहिती स्थानिक रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या अपघातामुळे उत्तरेकडून मुंबईकडे येणार्‍या अनेक गाड्या विविध स्थानकात थांबविण्यात आल्या आहेत. दोरांतो एक्सप्रेससह अनेक गाड्या भुसावळ, मनमाड आणि नाशिक स्थानकात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र इगतपुरी-मुंबई दरम्यानची वाहतूक सुरळीत सुरु आहे.