आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालगाडीचे सहा डबे घसरले; साेमवारी ९, मंगळवारच्या १५ गाड्या रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ इगतपुरी - मध्य प्रदेशातील इटारसीतील सिग्नल केबिनला लागलेली अाग व मुंबईतील पावसापाठाेपाठ मध्य रेल्वेवर साेमवारी तिसरे संकट काेसळले. इगतपुरी स्थानकाजवळ दुपारी ४.५५ वाजता मालगाडीचे सहा डबे घसरल्याने मुंबईकडून येणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. सात गाड्या नियाेजित वेळेपेक्षा उशिराने धावत हाेत्या.
इगतपुरीतील रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडीचे सहा डबे लाेकाे शेडनजीक असलेल्या राम मंदिरासमोर अचानक रुळांवरून घसरले. त्यातीन दाेन डबे चाकासह जमिनीत शिरले. एक डबा बाजूला असलेल्या पोलवर आदळला. घटनास्थळाच्या बाजूलाच पादचारी मार्ग, रेल्वे वसाहत, आठचाळ, फुलेनगर, सहा बंगला अशा वसाहती आहेत. तेथील शाळा सुटण्याच्या १५ मिनिटे अाधी ही दुर्घटना घडली. त्यानंतर अपघातस्थळी नागरिक व विद्यार्थ्यानी गर्दी केली हाेती.
२४ तासांत हाेणार मार्ग ठीक
रुळांवरून घसरलेले डबे दूर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात अाले असून येत्या २४ तासांत मार्ग ठीक होईल, अशी माहिती स्टेशन मास्टर व्ही. आर. जाधव यांनी दिली. या गाड्यांना विलंब : हुतात्मा व गाेदावरी एक्स्प्रेस अडीच तास, तर लखनऊ, सेवाग्राम, नंदीग्राम, इगतपुरी-मनमाड शटल व अजनी या गाड्या एक तास उशिरा धावत हाेत्या.
साेमवारी झाल्या ९ गाड्या रद्द : भुसावळ- मुंबई मार्गावरील तब्बल ९ सुपरफास्ट व एक्स्प्रेस गाड्या साेमवारीही रद्द करण्यात अाल्या. त्यात राजेंद्रनगर मुंबई, गाेरखपूर मुंबई, फैजाबाद मुंबई साकेत एक्स्प्रेस, कुर्ला वाराणसी रत्नागिरी, कुर्ला बरेली, नांदेड अमृतसर सचखंड, कुर्ला दरभंगा, कुर्ला मुजफ्फरपूर पवन एक्स्प्रेस यांचा समावेश हाेता.
अाजच्या १५ गाड्या रद्द
इटारसीतील सिग्नल पॅनल केबिनच्या दुरुस्तीसाठी शेकडाे तंत्रज्ञ दिवस-रात्र काम करत असले, तरी ते पूर्ण हाेण्यासाठी अजून अवधी लागणार अाहे. त्यामुळे एकाच ट्रॅकवरून वाहतूक सुरू असल्याने व ज्या गाड्या धावू शकल्या नाहीत त्या गाड्या परतीच्या प्रवासासाठी रद्द केल्या जात अाहेत. याच कारणामुळे मंगळवारी (दि.३०)भुसावळकडे जाणाऱ्या जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, महानगरी, लखनऊ, काशीसह सात, तर मुंबईकडे जाणाऱ्या कृषीनगर, पवन, कामायनी, जबलपूर, अलाहाबाद, गाेरखपूरसह पंधरा गाड्या रद्द करण्यात अाल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...