आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालगाडीचे तीन डबे इगतपुरीजवळ घसरले, तांत्रिक अडचणीमुळे १३ गाड्या रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इगतपुरी रेल्वेस्थानकावर सोमवारी सकाळी मालगाडीचे तीन डबे ट्रॅकवरुन घसरले. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. ही घटना साइड ट्रॅकवर घडल्याने वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र इटारसी येथील सिग्नल पॅनल केबिनच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने अप-डाऊनकडील १३ लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या रद्द कराव्या लागल्या.

इगतपुरीवरुन कसा-याकडे जाणा-या मालगाडीचे तीन डबे सोमवारी सकाळी ट्रॅकवरुन घसरले. रेल्वे यंत्रणेला तातडीने ट्रॅकवरील डबे तातडीने हटविण्यात यश अाल्याने वाहतुक सुरळीत सुरु राहिल्याची माहिती इगतपुरी स्थानकाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली. दरम्यान, इटारसी पॅनल केबिनचे दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात अाल्याने प्रवाशांचे हाल महिन्यानंतरही सुरुच अाहेत. गाड्या रद्द होत असल्याने तिकीट रद्द करावे लागत अाहे, तर दुसरीकडे धावणा-या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना तासन् तास स्थानकावर ताटकळत बसावे लागत अाहे. मध्य रेल्वेच्या मागे महिनाभरापासून लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. साेमवारी भुसावळकडे धावणा-या कलकत्ता मेल, जनता एक्स्प्रेस, महानगरी, वाराणसी, काशी, बरेली,हरिद्वार व पवन एक्स्प्रेस रद्द करण्यात अाली, तर मुंबईकडे धावणारी वाराणसी, महानगरी, राजेंद्रनगर व गोदान एक्स्प्रेस रद्द कराव्या लागल्या.