आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल, फेसबुक देणार नाशिकच्या रस्त्यांना क्रमांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरातील अनेक काॅलनी, साेसायटी परिसरात रस्त्यांचे जाळे वाढत असल्यामुळे रहिवासी पत्ते शाेधण्यात अडचणी येत अाहेत. या पार्श्वभूमीवर फेसबुक गुगल समूहाने एमअायटी बाेस्टनच्या मदतीने नाशिक शहरातील काॅलनीनिहाय रस्त्यांना क्रमांक देण्याची तयारी दाखवली अाहे.

शहराचा दिवसेंदिवस चाैफेर विस्तार हाेतअसून, सद्यस्थितीत महापालिकेलगतची अनेक खेडी शहरात दाखल झाली अाहेत. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात अनेक माेठ्या काॅलनी वा साेसायट्या तयार हाेत अाहेत. या ठिकाणी अनेक नवीन वसाहती तयार झाल्या असून, येथील रहिवाशांनाही पत्ते सापडण्यात अडचणी येत अाहेत. त्यांच्याकडे येणारे पाेस्टमन, अाॅनलाइन शाॅपिंगच्या वस्तू पुरवणारे अादी सर्वांचीच गैरसाेय हाेत असून, या वसाहतीतील रस्त्यांना क्रमांक दिल्यास गैरसाेय टळेल, असे महासभेत अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...