आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govdavari Ghat Unclean After Spending Crores Of Rupees

कोट्यवधी खर्चून अस्वच्छतेचा ‘घाट’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकुंभ मेळ्याच्या पर्वणीकाळात लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील विविध भागात कोट्यवधी रुपये खर्च करून घाटांची निर्मिती करण्यात आली खरी. परंतु, कुंभमेळा पार पडल्यानंतर या घाटांना बकाल स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. कुंभमेळा संपल्यानंतरही या घाटांचा उपयोग नाशिककरांना तसेच पर्यटनवाढीच्या दृष्टीने होईल, असे दावे केले गेले. घाटांची रचना बदलण्यापर्यंत ऐनवेळी अनेक घाटही घातले गेले. या ठिकाणी अॅम्पी थिएटर, उद्याने, दिवसा उन्हापासून बचाव होण्यासाठी छोटी छोटी आकर्षक झाडे असे अनेक उपाय योजले गेले. मात्र, सर्वात महत्त्वाचा उपाय असलेल्या स्वच्छतेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. परिणामी, आता याच घाटावर नाक दाबून फिरण्याची वेळ पर्यटकांवर आली आहे. ‘डी. बी. स्टार’ प्रतिधिनीने लक्ष्मीनारायण घाट, कन्नमवार घाट आणि टाकळी घाटाची पाहणी केला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली.

कपडे,वाहने धुण्यासाठी वापर
बहुतांश लोकप्रतिनिधींनी घाट बांधणीला विरोध दर्शविला होता. मात्र, तरीही त्यांचीही दिशाभूल करण्यात प्रशासन यशस्वी झाले. परिणामी, सव्वाशे कोटी खर्चून घाट बांधण्याचे पुण्यकर्म पार पाडण्यात आले. आता घाटांची आजची अवस्था पाहता, त्याचा उपयोग वाहने, जनावरे कपडे धुण्यासाठी होऊ लागला आहे, त्यामुळे घाट बांधणीचा घाट घालून आपली पोळी भाजून घेणाऱ्यांविषयी नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

घाटांवर पसरली दुर्गंधी...
सिंहस्थातविकसित करण्यात आलेल्या तपोवनजवळील लक्ष्मीनारायण मंदिराजवळील घाटावर मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक पिशव्या सडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. परिणामी, सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, पर्यटकांना तोंडावर रुमाल बांधून फिरण्याची वेळ आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.