आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Approved 80 Crore For Godavari River Ghat Development

‘लक्ष्य’ सिंहस्थाचे: गोदाघाटासाठी 80 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोदावरी घाट विकासाची जबाबदारी राज्य शासनाने महापालिकेकडून काढून घेत पाटबंधारे विभागाकडे सोपवल्यानंतर शहरातील नदीघाट विकासासाठी 80 कोटी 76 लाखांचा, तर त्र्यंबकेश्वर येथील घाट विकासासाठी 35 कोटी 74 लाख रुपयांचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने सादर केला आहे.

घाट विकासाचे काम सोपवण्यात आल्यानंतर 2015-16मधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामांची निकड लक्षात घेता पाटबंधारे विभागाने तयारी सुरू केली आहे. ही कामे मार्च 2015 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीकडे विभागाचे लक्ष लागले असून, त्यानंतर कामे सुरू होणार आहेत.

सिंहस्थासाठी एक कोटी भाविक अपेक्षित
आगामी सिंहस्थात नाशिकमध्ये सुमारे एक कोटी भाविक येणे अपेक्षित आहेत. त्यादृष्टीने पाटबंधारे विभागाने नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात घाट विकासाचे प्रस्ताव सादर केले आहेत. घाट विकासाची ही कामे मार्च 2015 पर्यंत पूर्णत्वास जातील. गिरीश संघाणे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग

नाशिकमध्ये होईल घाट विकास
> टाळकुटेश्वर पूल ते कन्नमवार पूल
> कन्नमवार पुलाच्या पुढचा परिसर
> लक्ष्मीनारायण पूल ते कपिला संगम
> टाकळी पुलापुढील परिसर
> जेलरोड येथील स्वामी जनार्दन पुलाच्या पुढील परिसर

त्र्यंबकेश्वर घाट विकासातील टप्पे
> स्मशानभूमी ते गजानन महाराज संस्था आर्शम परिसरातील घाट विकास
> अहिल्या व गोदावरी नदी संगम परिसरात घाट विकास
> अहिल्या तलावाची उंची वाढविणे
> गोदावरी नदीवरील पादचारी पूल
> अहिल्या व नीलगंगा नदी, म्हातारओहळ नाला आदींच्या तळाचे बांधकाम
> गोदावरी नदीघाट विकास सुधारणा.