आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात मिळणार ‘वेलनेस’ उपचार, सेंटर सुरू करण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यास रुग्णांना अधिक लाभ झाल्याचे निसर्गोपचारातून निदर्शनास आले आहे. आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढत असल्याने जिल्हास्तरावर वेलनेस सेंटर सुरू करण्याच्या प्रस्तावास शासनस्तरावर मंजुरी मिळाली आहे. जवळच निसर्गोपचार मिळणार असल्याने रुग्णांना हवापालट करण्यासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.
निसर्गोपचाराद्वारे काही विशिष्ट आजाराच्या रुग्णांना लाभ झाला आहे. काही रुग्णांना अॅलोपथी उपचाराद्वारे गुण येत नाही, अशा रुग्णांसाठी आयुषद्वारे निसर्गोपचार केले जातात. असाध्य आणि दुर्धर आजारांवर निसर्गोपचार फायदेशीर ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा रुग्णालयात सिद्धी उपचार येथे मिळत नाहीत. याकरिता जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये उपरुग्णालयांमध्ये वेलनेस सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव आला होता. केंद्रस्तरावर या उपचार पद्धतीची प्रभावी जनजागृती सुरू असल्याने शासनाने प्रस्तावाची दखल घेत तत्काळ सेंटर सुरू करण्याचे अादेश आरोग्य विभागास दिले. पहिले निसर्गोपचार केंद्र सटाणा येथे सुरू करण्यात आले आहे.
केंद्रात मिळणार साठ प्रकारचे उपचार
निसर्गोपचारकेंद्रामध्ये आहारविहार, मडथेरपी, सनबाथ, आयुष विभागाकडून वेलनेस सेंटर, स्पोर्ट मेडिसिन चिकित्सा विभाग, आरोग्य संस्कार शिबिर, शिरोधारा, ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर केंद्र अादी साठ प्रकारचे उपचार दिले जाणार आहेत.
केरळच्या धर्तीवर उपचार
केरळमध्येमिळणारे विविध निसर्गोपचार नाशिकमध्ये मिळणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे.
निसर्गोपचार फायदेशीर
आयुषपद्धतीने शारीरिक सुदृढता मानसिक प्रसन्नता मिळते. जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी हा उपचार वरदान ठरणार आहे. डॉ.नीलेश पाटील. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, आयुष विभाग.
परिणामकारक उपचार
निसर्गोपचारपरिणामकारक असल्याने ग्रामीण भागात केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक