आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Government D.Ed College Issue In Dy. Education Officier

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अध्यापिका विद्यालयाचा प्रश्न, स्थलांतराचा निर्णय शिक्षण उपसंचालकांच्या कोर्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शासकीय कन्या शाळेतून अध्यापिका विद्यालय स्थलांतरित करावे की नाही, याबाबतच्या निर्णयाचा चेंडू शिक्षण उपसंचालकांच्या कोर्टात टोलावण्यात आला आहे.

कन्या शाळेचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे तसेच पहिली ते चौथीच्या नव्या वर्गासाठी जागा कमी पडत असल्याचे कारण देत येथील अध्यापिका विद्यालयाचे स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले होते. 70 वर्षांपासून सुरू असलेले अध्यापिका विद्यालय का स्थलांतरित करावे, असा प्रश्न उपस्थित करीत विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केले. त्यामुळे शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षण सचिवांशी चर्चा करून 2 ऑगस्टपर्यंत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात 2 ऑगस्टला व्यस्त बैठकीमुळे चर्चा झालीच नाही. शनिवारी शिक्षण सचिवांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून तसेच पुराव्यांची पडताळणी करून शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांनी निर्णय द्यावा, असे आदेश दिले. त्यानुसार, सोमवारी सुपे यांच्याकडून स्थलांतराबाबत सुनावणीची तारीख जाहीर होणार आहे.