नाशिक- दिवाळीची लगबग संपते न् संपते आणि शासकीय कामकाज रूळावर येते न् येते तोच पुन्हा एकदा शासकीय कर्मचा-यांना दिवसांआड येणा-या सुट्यांची दिवाळी साजरी करायला मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीच दिवसाआड शासकीय सुट्या आल्याने कर्मचाऱ्यांकडून या सुट्यांत सहकुटुंब पर्यटनाचे बेत आखण्यास सुरुवातही झाली आहे.
लोकसभा आणि त्या पाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक शासकीय कार्यालयांतील प्रस्तावित विकासकामे, तसेच योजना रखडल्या होत्या. ही कामे आता गेल्या आठवड्यापासून थोडीफार मार्गी लागत असतानाच, या महिन्यातील सुट्यांचा त्यावर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. एका बाजूला शासकीय स्तरावरील विलंबाचा मुद्दा पुढे आला असतानाच, दुसरीकडे या सुट्यांची पर्वणी साधून निवडणूक कामांमुळे आलेला थकवा घालविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांकडून पर्यटनाचे नियोजन केले जात आहे.
विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्यापासूनच देशभरातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यात या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे ते नोव्हेंबरदरम्यान आठ दिवसांत तीन रजा टाकल्यास सलग आठ दिवस सुटी मिळणार असल्याने पर्यटनाचे बेत आखले जात आहेत. यात राज्य शासनाचे कर्मचारी आघाडीवर आहेत.
..अशा आहेत सुट्या
नोव्हेंबरलारविवार, नोव्हेंबरला मोहरमची सुटी, नोव्हेंबरला गुरूनानक जयंतीची सुटी, तर नोव्हेंबरला दुस-या शनिवारची सुटी नोव्हेंबरला रविवार आहे. यात 3, नोव्हेंबरला रजा टाकल्यास सलग आठ दिवस सुट्यांचा आनंद घेता येणार आहे.
कामकाजावर ताण
कर्मचाऱ्यांकडूनया सुट्यांची पर्वणी साधली जाण्याची चिन्हे असल्याने विविध शासकीय कार्यालयांवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा, विधानसभेची आचारसंहिता त्यानंतर दिवाळीच्या सुट्या यामुळे रेंगाळलेली शासकीय कामे या काळात आणखी रेंगाळण्याची शक्यता आहे.