अन् पालटले "इएसआय'चे रूप
नाशिक - कचऱ्याच्याजागी पेव्हर ब्लॉक्सच्या पायघड्या, प्रवेशद्वाराशी रांगोळीचा साज, थुंकदाणी बनलेल्या भिंतींवर फिरलेला रंगाचा हात, मुख्य कक्षात लावलेले नवेकोरे फलक आणि विविध विभागांच्या प्रवेशद्वारावर लावलेले माहितीचे िडस्प्ले... एखाद्या बड्या खासगी रुग्णालयाला लाजवेल असा दिमाख शुक्रवारी "इएसआय हॉस्पिटल'मध्ये रुग्णांनी अनुभवला.
राज्य कर्मचारी विमा योजनेच्या आयुक्त सीमा व्यास यांच्या दौऱ्यामुळे जादूची कांडी फिरल्यागत रातोरात या हॉस्पिटलचे रुपडे पालटले होते. या निमित्ताने का असेना अनेक वर्षांनंतर रुग्णांना स्वच्छता, नेटकेपणा आणि गतिमान कारभाराची प्रचिती आली.
कामगार त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने सातपूरमध्ये इएसआय रुग्णालय उभारण्यात आलेले आहे. या रुग्णालयाची गेल्या आठवड्यापर्यंत प्रचंड दुरवस्था होती. एरवी रुग्णालयात प्रवेश करताच येणारी दुर्गंधी, परिसरातील कचरा जागेवर नसलेल्या डॉक्टरांमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, शुक्रवारी आयुक्त व्यास येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत स्वच्छता, सजावटीसह रुग्णालय परिसराची साफसफाई करण्यात आली.
सातपूर अंबड औद्याेगिक वसाहतीतील कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना इएसआयकडून वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. यासाठी सुमारे ५५ ते ६० हजार विमाधारक कामगारांच्या वेतनातून त्याच्या अधिक पटीत व्यवस्थापनाकडून कपात केलेली रक्कम इएसआय प्रशासनाला मिळते. हा निधी महिन्याला पाच ते सहा कोटींपर्यंत जातो. त्याचा विचार करता अत्यंत दर्जेदार सेवा मिळणे अपेक्षित असताना, येथे दुर्दैवाने अत्यंत सुमार दर्जाच्या सुविधा कामगारांच्या नशिबी येत असतात. दर्जेदार सुविधांसाठी "कामगार विकास मंच'ने आंदोलनदेखील केले होते. मात्र, त्याचाही आजवर फरक पडलेला नव्हता.
उपस्थितीच्या फलकांसह डिस्प्लेही झळकले.
वैद्यकीय अधीक्षक पद रिक्तच
यारुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त असल्याने, त्याचा पदभार सोईनुसार सोपविण्यात येतो. त्याचप्रमाणे वर्ग च्या मेडिसीन स्त्रीरोग तज्ज्ञ या जागांसह फार्मासिस्ट सिस्टर यांची सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहे.
पार्किंगही शिस्तीत
गेल्याअनेक वर्षांपासून वाटेल तेथे वाहन उभी करण्याची सवय लागलेल्या रुग्णांना शुक्रवारी सुरक्षारक्षकाकडून वाहने एका रांगेत उभी करण्याचे आवाहन करण्यात येत होते.त्यामुळे प्रथमच वाहनांची शिस्तही दिसून आली.
डॉक्टरांसह वेळेत उपस्थिती
तज्ज्ञडॉक्टरांचे वार निश्चित असले तरी त्यांच्या येण्या-जाण्याची वेळ मात्र निश्चित नसते. त्यामुळे डॉक्टर कधी येतील कधी जातील याची शाश्वती नसते. या परिस्थितीमुळे रुग्णांना डॉक्टरांच्या भेटीसाठी सकाळपासूनच रांग लावावी लागते. शुक्रवारी मात्र सर्वच विभागातील डॉक्टर वेळेत आवर्जून उपस्थित असल्याने, रुग्णांना मोठा दिलासा लाभला.
रुग्णालय परिसरात प्रवेश करताच प्रवेशव्दारावर गप्पांमध्ये दंग असलेले कर्मचारी त्यांच्यासमोर जागा दिसेल तेथे उभ्या राहिलेल्या वाहनांमुळे परिसर बकाल बनला होता. रुग्णालयाच्या भिंतीवर ठिकठिकाणी तंबाखू पान खाऊन थुंकल्याचे किळसवाणे चित्र कायम होते. आवारातही कचऱ्याचे ढिग औषधांचे खोके फेकलेले आढळत. कळस म्हणजे शस्त्रक्रिया विभागातही अस्वच्छता होती.
मार्गदर्शक फलकही झळकले
कोणतेडॉक्टर कोणत्या वेळेत कार्यरत राहतील, याच्या माहितीचा मोठा नवा कोरा फलक रुग्णालयातील बाह्य रुग्ण नोंदणी विभागात झळकत होते. या फलकांवर सकाळपासून दुसऱ्या दविसापर्यंत कोण ऑन ड्यूटी असतील, त्यांची नावे टाकण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, याच वेळेत कुठली परिचारिका रुग्णवाहिका चालक उपस्थित असतील, याचीही नोंद करण्यात आली होती.