आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय रुग्णवाहिकांचेही खासगीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवेचे पुण्यापाठोपाठ आता टप्याटप्याने सर्वत्र खासगीकरण होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचा भाग म्हणून गरोदर माता व नवजात बालकांसाठी ही सेवा मोफत पुरविली जाते.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा पुरविली जाते. या योजनेंर्तगत गरोदर मातांना घरापासून ते शासकीय दवाखान्यांपर्यंत मोफत रुग्णवाहिका पुरवण्यात येते. तसेच योजनेतून नैसर्गिक प्रसूती किंवा सिझेरियन झालेल्या मातांना पोषक आहारही पुरवला जातो. या योजनेबाबत फारशी जनजागृती झाली नसल्याने बहुतांश रुग्णांना त्याची महिती नाही. परिणामी या सेवेचा लाभ फारच कमी रुग्णांनी घेतला आहे. पुणे येथे या योजनेचे खासगीकरण झाले आहे. टप्याटप्याने राज्यातील सर्वत्र खासगीकरण होणार असल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

केंद्र शासन घेणार निर्णय
केंद्र शासनाची योजना असल्याने सर्व निर्णय केंद्रस्तरावरूनच होतात. शासनाकडून त्याप्रमाणे कार्यक्रम राबविले जातात. शासकीय रुग्णवाहिका सेवेच्या खासगीकरणाचा निर्णय केंद्राचा आहे. त्यामुळे राज्याकडून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. रवींद्र शिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक

अभियान, योजनेतील सेवा व कार्यक्रम
गरोदर स्त्रिया व नवजात बालकांसाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम राबवण्यात येतो. गरोदरपणात बाळंतपणात व प्रसूती पश्चात 42 दिवसांपर्यंत सर्व सेवा, शस्त्रक्रिया, औषधे व आहार मोफत दिला जातो. शून्य ते एक वर्षाच्या नवजात आजारी बालकांसाठीही घरापासून प्राथमिक आरोग्यकेंद्र, शासकीय रुग्णालयापर्यंतच्या प्रवासासाठी मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते.