आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदयार्थ्यांच्या निधीवर ठेकेदार गबर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ग्रामीण भागातील गरीब होतकरू आदिवासी वदि्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा तालुकास्तरावर शासकीय वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. येथे गुणवत्ता यादीनुसार वसतिगृहात प्रवेश दिला जातो. अशाच प्रकारे नाशिकमध्ये जवळपास पाच हजार आदिवासी वदि्यार्थी वसतिगृहात राहात आहेत. अशा व्यवस्थेवर संपूर्ण राज्यभरात तब्बल पाच हजार कोटी रुपये खर्च होतात. त्याचाच एक भाग असलेल्या वसतिगृहातील वदि्यार्थ्यांची मात्र प्रचंड गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर डी. बी. स्टार चमूने प्राथमिक स्वरूपात शहरातील शिवाजीनगर वसतिगृह, क. का. वाघ अभियांत्रिकी महावदि्यालयामागील वदि्यासदन आणि जय अंबे या तिन्ही आदिवासी वदि्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट दिल्यावर समस्यांचे "याचि देही याचि डोळा' दर्शनही घडले. त्यानंतर येथील वदि्यार्थ्यांनी असुविधांचा पाढा वाचत नाईलाजास्तव याविषयी कोणाकडेही तक्रार करता येत नसल्याची कैफियतच मांडली.

तीनमहिन्यांपासून निर्वाह भत्ता प्रलंबित
महाराष्ट्रशासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या ११ नोव्हेंबर २०११ च्या परिपत्रकात वदि्यार्थ्यांना विभागीय स्तरावर आठशे, जिल्हास्तरावर सहाशे, तर तालुकास्तरावर प्रत्येक वदि्यार्थ्याला दरमहा निर्वाह भत्ता म्हणून पाचशे रुपये देण्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठी दरमहा शंभर रुपये देण्याचेही नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही वदि्यार्थ्यांना तीन महिन्यांपासून एकही रुपया मिळालेला नाही. भाडे थकल्याने इमारत दुरुस्तीचे काम रखडले आहे.

तीन वर्षांपासून भाडेच मिळालेले नाही
आदिवासीविकास विभागाने बहारे जंगल कामगार सोसायटीकडून शिवाजीनगरातील तीन इमारती वदि्यार्थी वसतिगृहासाठी भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. या सर्वच इमारतींची मोठी दुरवस्था झाली असून, आदिवासी विकास विभागाकडून दि. जुलै २०१२ पासून भाडे मिळाल्याने बहारे जंगल कामगार सोसायटीने या इमारतींची दुरुस्ती दोन वर्षांपासून केलेली नाही.

ठेकेदारांचा प्रतिसाद नाही
स्वयंपाकघरातीलअस्वच्छता जेवणाच्या निकृष्ट जेवणाबद्दल वसतिगृहात असलेल्या खानावळ चालविणाऱ्या ठेकेदारांशी डी.बी. स्टार प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.

वदि्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत
परिपत्रकानुसारशैक्षणिक वर्ष सुरू होताच वदि्यार्थ्यांना पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी तरतूद आहे. मात्र, शहरातील वसतिगृहात राहणारे वदि्यार्थी अद्यापही पुस्तके आणि शालेय साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सडके आणि मोड फुटलेले कांदे.
दाळीत आढळलेले मेलेले झुरळ.
काचा फुटल्याने थेट खोल्यांमध्ये पावसाचे पाणी येते.
वसतिगृह इमारतीखाली कचऱ्याचा साचलेला ढीग.
स्वयंपाकघरातील कळकट्ट झालेल्या भिंती अस्वच्छता.

रांगेत उभे राहूनदेखील आदिवासी वसतिगृहातील अन्नाला चव असेलच याची काही शाश्वती नसते.
नरेंद्र आघाव, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग

आयुक्तांची समस्यांकडे डोळेझाक
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून शासकीय निमशासकीय वसतिगृहांचा दर्जा घसरला आहे. वदि्यार्थ्यांना विविध समस्या भेडसावत असतानाही आयुक्त त्याकडे डोळेझाक करत आहेत. १५ आॅगस्ट तोंडावर असतानाही वदि्यार्थ्यांना गणवेश निर्वाह भत्ता मिळालेला नाही. लक्ष्मणजाधव, विभागीय अध्यक्ष, अ. भा. आदिवासी विकास परिषद

कच्च्या पोळ्या खाव्या लागतात...
गेल्याअनेक दिवसांपासून आमची गैरसोय होत आहे. वसतिगृहात नियमितपणे स्वच्छता होत नाही. आंघोळीसाठी बादलीही नाही. पावसाळ्यात इमारत गळते. नाष्ट्यामध्ये पोहे दिलेच जात नाहीत. जेवण व्यवस्थित मिळत नाही. कच्च्या पोळ्या खाव्या लागतात. कृष्णाबोरसे, वदि्यार्थी, जय अंबे वसतिगृह

जेवणात अळ्या, दखल नाही
पाणीआणण्यासाठी आम्हाला थेट तळमजल्यावर जावे लागते. जेवणात अळ्याही निघतात. रूममध्ये पंखा नसल्याची तक्रार अनेकदा करूनही अद्याप कोणी दखल घेतलेली नाही. आनंदारांगटे, वदि्यार्थी, शिवाजीनगर वसतिगृह

प्रतिसाद नोंदवहीत दहशत दाखवून फेरबदल
वसतिगृहातीलवदि्यार्थ्यांना सकाळी नास्ता, दुपारी सायंकाळी जेवण दिले जाते. हे जेवण वदि्यार्थ्यांना आवडले की नाही यासंदर्भातील फीडबॅक फॉर्म अर्थात प्रतिसाद अर्ज संबंधित ठेकेदारा कडून वेळोवेळी भरून घेतला जातो. डी.बी. स्टार प्रतिनिधीने ही भोजन चव वही तपासली असता, त्यात मात्र चांगले जेवण मिळत असल्याच्या प्रतिक्रिया वदि्यार्थ्यांनी नोंदविल्या असल्याचे दिसून आले. जर चांगले जेवण िमळते असे तुम्हीच म्हणतात, तर मग आता तक्रारी खऱ्या मानायच्या का, असा सवाल डी.बी. स्टार प्रतिनिधीने या ठिकाणी उपस्थित वदि्यार्थ्यांना केला असता, त्यावर कारवाईची भीती दहशतीमुळे नाइलाजास्तव चांगली प्रतिक्रिया लिहावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

वदि्यासदन वसतिगृहातील स्वयंपाकात सडके कांदे - जयअंबे वसतिगृहापासून काही अंतरावर असलेल्या दुर्गानगरमधील वदि्यासदन वसतिगृहाच्या पाहणीत सडलेले आणि मोड आलेले कांदे स्वयंपाकात वापरले जात असल्याचे नदिर्शनास आले. यावरून वदि्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत अधिकारी किती गंभीर आहेत, याची प्रचितीही या ठिकाणच्या पाहणीत आली.

जय अंबे वसतिगृहातील दाळीमध्ये आढळले झुरळ - शिवाजीनगरमधीलवसतिगृहाची दुरवस्था पाहिल्यानंतर डी.बी. स्टार प्रतिनिधीने पंचवटीमधील जय अंबे वसतिगृहाला भेट दिली. येथील परिस्थितीही फारशी वेगळी नव्हती. येथे वदि्यार्थ्यांना फाटक्या गाद्यांवर झोपावे लागत असून, संगणक लॅब नसल्याने वदि्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. बाथरूममध्ये लाइटची व्यवस्था नसल्यामुळे पहाटे उठणाऱ्या वदि्यार्थ्यांना अंधारातच आंघोळ उरकावी लागत असल्याचे सांगण्यात आले. स्वयंपाकगृहाची पाहणी केली असता वदि्यार्थ्यांना कच्च्या पोळ्या खाव्या लागत असून, दाळीमध्ये मेलेली झुरळे आढळून आली.

डी.बी. स्टार प्रतिनिधीने शिवाजीनगरमधील वसतिगृहाच्या स्वयंपाकगृहाला भेट दिली असता तेथील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. स्वयंपाकगृहाच्या काळ्याकुट्ट भिंती आणि अक्षरशः किळसवाणे वातावरण अशा वातावरणात वदि्यार्थ्यांना कोणत्या दर्जाचे अन्न पुरवले जात असेल याची कल्पनाही केलेली बरी असेच चित्र या ठिकाणी होते. येथील वसतिगृहात एकूण ४७५ वदि्यार्थी राहात असून, या मुलांसाठी केवळ प्रसाधनगृहे आहेत. झोपण्यासाठी खाटा नसल्यामुळे बहुतांश वदि्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागते. रूममध्ये पंखे नसल्याने उन्हाळ्यात वदि्यार्थी घामाघूम तर होतात शिवाय रात्री डासांचाही सामना करावा लागतो. वेळापत्रकानुसार जेवण मिळत नसून त्याचा दर्जाही चांगला नसल्याची तक्रार वदि्यार्थ्यांनी केली. दोन वर्षांपासून येथील इमारतींच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने खिडकीच्या तुटलेल्या काचांची दुरवस्था कायम आहे. तसेच इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

अशी आहे खर्चाची तरतूद (प्रति वदि्यार्थी)...
- प्रत्येकशैक्षणिक वर्षातील दोन शालेय गणवेशांसाठी- १,००० रुपये.
- ड्रेसकोड असलेल्या महावदि्यालयीन वदि्यार्थ्यांसाठी दोन गणवेशांसाठी- २,००० रुपये.
- वैद्यकीय अभ्यासक्रमातील वदि्यार्थ्यांच्या अॅप्रनसाठी - ५०० रुपये.
- वैद्यकीय शाखेच्या वदि्यार्थ्यांच्या साहित्यासाठी - १,००० रुपये आणि स्टेथेस्काेपसाठी- १,००० रुपयांची तरतूद.

- अभियांत्रिकी वदि्यार्थ्यांसाठी बाॅयलर सूटसाठी प्रतिवर्ष - ५०० रुपये.
- अभियांत्रिकी पदवी, पदविकेच्या ड्राॅईंग बाेर्ड इतर साहित्यासाठी प्रतिवदि्यार्थी २,५०० रुपये.
- लॅब अॅप्रनसाठी- ५०० रुपये.
- शारीरिक शिक्षण महावदि्यालयातील दोन गणवेशांसाठी ४,००० रुपये.
- छत्री, रेनकाेट आणि गमबूटसाठी- ५०० रुपये.
- कला शाखेतील चित्रकला, संगीत इतर पदवी, पदविका तसेच, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील वदि्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी- ४,००० रुपये.
- शैक्षणिक सहलीसाठी- २,००० रुपये.
- कार्यशाळेसाठी- ५०० रुपये.
- प्रोजेक्ट रिपोर्टसाठी- प्रत्येक वदि्यार्थ्याला प्रत्येक प्रकल्पासाठी- १,००० रुपये.

अशी आहे वसतिगृहांची संख्या
शहरातएकूण- १२ वसतिगृहे.
त्यापैकी १० मुलांचे आणि दोन मुलींचे.
जिल्ह्यात एकूण- ३२ वसतिगृहे.
तक्रारींचे निराकरण करू, आरोपांबद्दल "नो कमेंट'
आदिवासी वदि्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असला तरी, प्रत्यक्षात त्याचा लाभ गरजूंना मिळत नसल्याची गंभीर बाब डी.बी. स्टारच्या पाहणीत उघड झाली. आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांना भेटी दिल्यानंतर एकवेळ पुरेसे जेवण मिळेल की नाही ही भ्रांत तर होतीच. मात्र, धक्कादायक म्हणजे जे जेवण दिले जात होते त्यातही झुरळांचा स्वैर वावर असल्याचे आढळून आले. कळकट्ट स्वयंपाकगृह, पुरेशा क्षमतेअभावी खालीच झोपण्याची वेळ आलेले वदि्यार्थी अशा अनेकविध समस्यांचा पाऊसच पडल्याचे दिसले. जनतेच्याच खिशातून सरकारद्वारे गोळा केल्या जाणाऱ्या पैशांवर वदि्यार्थ्यांचे पोषण होण्याऐवजी ठेकेदारच गब्बर होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांच्या भीतीने या कारभाराविषयी उघडपणे बोलायलाही वदि्यार्थी घाबरत असल्याचे चित्र आहे, त्यावर डी.बी. स्टारचा प्रकाशझोत...
त्याबद्दलच्या तक्रारींबद्दल काय?
शहरातीलआदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमध्ये साेयी-सुविधांचा अभाव आहे. त्याबद्दलच्या तक्रारींबद्दल काय?
- मीसर्व वसतिगृहांना वेळोवेळी भेट देत असतो. वदि्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवत असतो.
गेल्यातीन महिन्यांपासून वदि्यार्थी निर्वाह निधीपासून वंचित असून, मिळणाऱ्या जेवणाबाबतही वदि्यार्थी नाराज आहेत.

वसतिगृहांमधीलवदि्यार्थ्यांना नास्ता दोन वेळचे जेवण देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांना मेसचा ठेका देण्यात आला आहे. जेवणाबाबत वदि्यार्थ्यांच्या तक्रारी असतील तर ठेकेदारांना त्याबाबत लगेचच विचारणा करतो.

वदि्यार्थ्यांचे महावदि्यालय आणि शाळा सुरू होऊनही अद्याप त्यांना गणवेश आणि अन्य शालेय साहित्य मिळालेले नाही.
- मीयाबद्दल त्वरित चाैकशी करून गणवेश देण्यात नेमक्या काय अडचणी आहेत, याची माहिती घेतो. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. जेणेकरून त्यांना लवकरात लवकर सुविधा मिळू शकतील.

आदिवासी विकास आयुक्त नेहमीच वदि्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप वदि्यार्थ्यांच्या संघटनांनी केला आहे. त्याबद्दल काय?
- याबद्दलमी काहीही बोलू इच्छित नाही.