आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्यांएेवजी ‘तुम्ही तिथे कसे गेले, परवानगी काेणी दिली’ यावरच केली चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील त्र्यंबकरोडवर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात विविध ठिकाणांहून प्रशिक्षण घेण्यासाठी येणारे सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, या वसतिगृहात हव्या तशा सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून येत अाहेत. या ठिकाणी पूर्णवेळ गृहपालाची नियुक्ती नाही, आरोग्याच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यासह अांघोळीकरिता गरम पाण्याची सोय नाही. त्यामुळे थंड पाण्यानेच अांघोळी कराव्या लागतात. जेथे विद्यार्थी राहतात तेथे तर अत्यंद दयनीय अवस्था अाहे. रूममध्ये पंखे नाहीत, शौचालयाला दरवाजे नाहीत, शाैचालयात पाणी नाही. बहुतांश खोल्यांच्या जाळ्या तुटल्याने केवळ मच्छरच नव्हे तर सापदेखील येतात, अशी धक्कादायक माहिती एका विद्यार्थ्याने डी. बी. स्टारला दिली. तसेच सकाळी नऊनंतर पाणी संपलेले असते. दुपारी वसतिगृहात आले तर पाण्यासाठी शोधाशोध करावी लागते. येथे अशा समस्या विद्यार्थी येथे अापल्या मित्रमंडळींना वा घरच्यांना भेटण्यासाठी देखील बाेलावत नाहीत. ‘अाम्हीच कसेतरी राहताे, त्यांना कुठे बाेलवायचे’ असे ते सांगतात. याकडे मात्र येथील प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष अाहे. 
 
पहावं तिथे लिकेज... 
या वसतिगृहात कुठेही स्वच्छता दिसत नाही. किंबहुना जिकडे बघाल तिकडे कुठूनतरी पाणी टपकत असताना दिसते. काही भिंतींवर तर या पाण्यामुळे शेवाळे साचले अाहे. त्यामुळे डास माेठ्या प्रमाणात अाहेत, दुर्गंधी अाहे ती वेगळीच. यामुळे विद्यार्थी चांगलेच त्रस्त झाले अाहेत. 

विद्यार्थी पडतात अाजारी 
येथीलअत्यंत दयनीय अवस्थेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर हाेत अाहे. अत्यंत घाण, त्यातच जेवण, कुबट वास, दूषित पाणी, दुर्गंधी यातच विद्यार्थी रहात असल्याने अनेक विद्यार्थी अाजारी पडत अाहेत. 

अाम्ही बाेलताे पण, अामचे नाव घेऊ नका... अाम्हाला नापास करतील... 
^वसतिगृहातील समस्यां संदर्भात अाम्ही तुमच्याशी बाेलताे पण, अामचे कुठेही नाव घेऊ नका... अाम्हाला सर नापास करतील, इथून काढून टाकतील. येथील समस्यांसंदर्भात अाम्ही मुख्याध्यापकांकडे वारंवार तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे अभ्यास करताना मोठी अडचण निर्माण हाेते. काहीजण बाहेरगावचे अाहेत. त्यांना धड घरीही जाता येत नाही अाणि इथेही राहता येत नाही असे झाले अाहे. वीज, पाणी अशा सगळ्याच समस्या अाहेत. -विद्यार्थी, आयटी आयवसतिगृह 

तुटलेले पलंग 
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात पाहणी केली असता विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी असलेल्या खाटांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे दिसून आली. वसतिगृहाच्या पाहणीत जवळपास सर्वच खाटा तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. यामुळे त्यांना फरशीवर झोपावे लागत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. 

दीवाबत्ती गुल सगळीकडे घाण 
येथे अद्याप ट्यूबलाइट आणि पंख्यांची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. या ठिकाणी पंख्यांसाठी संपूर्ण वायरिंग करण्यात आलेली आहे. मात्र, पंखेच लावण्यात आलेले नाही. तसेच वसतिगृहात ट्यूबलाइटचीही व्यवस्था नसल्याने फक्त बल्ब लावण्यात अाले अाहेत. त्यातच विद्यार्थी राहतात अाणि अभ्यास करतात. 

वसतिगृहात प्रवेश करताच घाण, अस्वच्छता, कुबट वास सर्वत्र असताे. तसेच वसतिगृहाच्या भिंतींवर गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसून येतात. ड्रेनेजमधूनही दुर्गंधीयुक्त पाणी वसतिगृहात येते. त्याचबरोबर संपूर्ण परिसरात कचरा गोळा करण्यासाठी काेणतीही व्यवस्था नाही. तर एका ठिकाणी प्रचंड कचरा साचलेला दिसून आला. 

येथे एकाही शौचालयाला दरवाजा नाही. तर शौचालयात प्रचंड घाण आणि अस्वच्छता असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले. तसेच शौचालयात केवळ एकाच नळाला पाणी येत असून त्यासही अनेकवेळा पाणी नसते.शौचालयासंदर्भात विद्यार्थ्यांकडून अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या अाहेत. मात्र, याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. 
ए. एफ. पाटील, प्राचार्य,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था 
बातम्या आणखी आहेत...