आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकसह देशभरातील सरकारी मुद्रणालये बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या अखत्यारितील नाशकातील गांधीनगर येथील मुद्रणालयासह देशभरातील मुद्रणालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली मुद्रण निर्देशालयाकडून त्या आशयाचा आदेश गुरुवारी दुपारी गांधीनगर प्रेस प्रशासनास प्राप्त झाला आहे. निर्णयाची माहिती कळाल्यानंतर कामगार हबकून जाऊन नि:शब्द झाले आहेत.

मुद्रणालयाची सविस्तर माहिती तत्काळ सायंकाळी पर्यंत पाठवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रेस कामगार युनियनची नियोजित ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी सायंकाळी गांधीनगर वेल्फेअर क्लब हॉलमध्ये झाल्यानंतर युनियनचे जनरल सेक्रेटरी विजय वाघले यांनी उपस्थित कामगारांना प्रशासनास प्राप्त आदेशाची माहिती दिली.

सरकारच्या या निर्णयामुळे कामगारांना काही वेळ सुचलेच नाही. मुद्रणालय वाचवण्यासाठी वेळप्रसंगी एकजुटीने संघर्षाची तयारी त्यांनी दर्शवली. गांधीनगर मुद्रणालयाची कामगार संख्या, वर्षअखेर निवृत्त होणाऱ्या कामगारांची संख्या, पेन्शनसाठी पात्र कामगार, यंत्रसामग्री, मुद्रणालयाची जागा त्यांचे मूल्य यासह इतर माहिती अवघ्या काही तासांत देण्याचे आदेश निर्देशालयाने दिले आहेत. आदेशानुसार कामगारांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. मुद्रणालय बंद केल्यानंतर तेथील कामगारांच्या भविष्याबाबत काहीच उल्लेख आदेशात नाही.