आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या घोटाळ्यांची तातडीने चौकशी करावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्रातआणि राज्यात अस्तित्वात आलेल्या भाजप सरकारने वर्षभरातच आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली अाहे. त्यामुळे भाजप सरकारच्या घोटाळ्यांची त्वरित चौकशी झाली पाहिजे, अशी प्रमुख मागणी करून डाव्या लोकशाही आघाडीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
ललित मोदी प्रकरण, राज्यातील चिक्की घोटाळा, केंद्रीस मंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षणाची खोटी माहिती दिल्याचे आरोप होत आहेत. या सर्व बाबींची कसून चाैकशी झालीच पाहिजे, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: खाणार नाही आणि कोणालाही खाऊ देणार नसल्याची वल्गना केली होती. ‘अच्छे दिन’च्या नाऱ्यावर मतदारांना भुरळ घातली. परंतु, वर्ष होऊनही जनतेला ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षाच असून, घोटाळे मात्र जोरात सुरू आहेत, असा आरोप करत डावी लोकशाही आघाडी, भाकप, माकप, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर, भारिप बहुजन महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. या वेळी आमदार जे. पी. गावित, सीताराम ठोंबरे, श्रीधर देशपांडे, राजू देसले, अॅड. मनीष बस्ते, केरू पाटील, संजय जाधव, दत्ता तुपे, संगीता उदमले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरीही वाऱ्यावर...
एकीकडेपावसाने अोढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून, शासन मदत करण्याच्या विचारातच दिसत नाही. शेतकरीविरोधी भूसंपादन कायदादेखील मंजूर करण्यात आला आहे. भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला असून, शासनाने जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही आंदोलनावेळी करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...