आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाेट्या व्यावसायिकांना संपविण्याचा घाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काही काॅर्पाेरेट कंपन्यांच्या इशाऱ्यावरून छाेट्या सुवर्ण व्यावसायिकांना संपविण्याचा घाट सरकारकडून घातला जात असून, सुवर्ण व्यवसाय पन्नास टक्क्यांवर त्यांना अाणायचा अाहे, असा अाराेप महाराष्ट्र राज्य सुवर्ण सराफी व्यावसायिक असाेसिएशनचे अध्यक्ष फतेचंद राका यांनी केला. सरकारच्या या मुस्कटदाबीविरुद्ध गुरुवारी (दि. १७ मार्च) दिल्लीतील रामलीला मैदानावर विराट धरणे अांदाेलन करून सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार असून, यात राज्यातील अाठ हजारांवर सुवर्ण व्यावसायिक सहभागी हाेणार असल्याचे राका यांनी सांगितले.

केंद्र सरकारने लादलेला एक टक्का अबकारी कर रद्द करावा, यामागणीकरिता गेल्या पंधरा दिवसांपासून सराफांचा देशव्यापी संप सुरू अाहे. याच अनुषंगाने नाशिकमधील राजयाेग मंगल कार्यालयात झालेल्या सराफी व्यावसायिकांच्या भव्य मेळाव्यात राका यांनी मार्गदर्शन केले व्यासपीठावर नाशिकचे अध्यक्ष राजेंद्र अाेढेकर, गिरीश टकले, राजेंद्र दिंडाेरकर, राजेंद्र वाईकर, गिरीश नवसे अादी. अादी हाेते.

मागे सरकारने सुवर्ण नियंत्रण कायदा अाणला तेव्हा राज्यात १०९ सुवर्णकारांनी अात्महत्या केल्या हाेत्या याकडे लक्ष वेधत सरकारने लादलेल्या या नव्या या धाेरणामुळे उपासमारीची वेळ व्यावसायिकांवर अाेढावणार असल्याचे सांगतानाच असंघटीत क्षेत्राला मारून टाकण्याचे धाेरण या सरकाचे असल्याची टिका राका यांनी केली. एका बाजूला सरकार साेन्याची अायात कमी करायचे म्हणते दुसरीकडे मात्र भारतात एक ग्रॅमही साेने उत्पादन हाेत नसतांना सरकार स्वत अशाेकचक्र असलेली गाणी विक्री करायला साेने कुठून अाणते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वित्तीयतुटीचे कारण पुढे करून साेन्याची अायात घटविण्याकरीता अायातीचे प्रमाण कमी करायचेच असेल तर या क्षेत्रातील काॅर्पाेरेट कंपन्यांची साेने अायात किती अाहे, याचा अभ्यास सरकारने करावा असा सल्ला त्यांनी दिला. मेळाव्याचे सूत्रसंचालन सुनील महालकर यांनी केले.

सिडकाे सराफ असाेसिएशनचे धरणे अांदाेलन
‘एक्साईज ड्यूटी’चा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी सिडको सराफ असोसिएशनच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काळे झेंडे घेऊन, काळ्या पट्ट्या हातावर बांधत शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना यावेळी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नितीन सराफ, नारायण दुसाने, रवींद्र भामरे, सहसचिव अभिजित खरोटे, संदीप सोनवणे, शशिकांत मोरे, सुमंत अहिरराव आदी सहभागी झाले होते.

राका यांनी मांडले हे मुद्दे
>अबकारी लादल्याने प्रति दहा ग्रॅम साेन्यामागे ४०० रुपये, तर तीन लाख रुपये िकलाेमागे जास्त माेजावे लागणार अाहे. यामुळे चाेरट्या मार्गाने साेने अायात वाढेल, ज्याचे सामाजिक दुष्परिणामही हाेणार अाहेत.
>पॅनची सक्ती सरकारने साेने खरेदीकरिता जरूर करावी, मात्र ८५ टक्के लाेकांकडे अाज पॅनकार्ड नाहीत. त्यांना अगाेदर पॅनकार्ड उपलब्ध करून द्यावे.
>५० हजारांवरील खरेदीवर केवायसी भरून द्यायचा अाहे, साेने खरेदी करून ते काेणाला भेट द्यायचे अाहे त्याची नोंदणी त्यात करायची अाहे ही पावती पुढील दहा वर्षे सांभाळून ठेवायची अाहे, हे अत्यंत चुकीचे अाहे.
>साेने अायातीवर नियंत्रणच ठेवायचे अाहे, तर सरकारने एमसीएक्स बंद करावे, सहा लाख सुवर्ण व्यावसायिकांची अडवणूक करण्यापेक्षा साेने अायात व्यवहारावर नियंत्रण अाणण्याकरिता सरकारने २७ बँकांवर रेकाॅर्डच तपासावे इतकी माेठी यंत्रणा याकरिता सरकारला राबविण्याची गरज नाही, असा सल्ला राका यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...