आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Graduate Pharmacy Aptitude Test News In Marathi, Aditya Darade, Divya Marathi

आखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षामध्ये नाशिकचा आदित्य देशात पहिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एआयसीटीईच्या पदव्युत्तर पदवी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अँप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट)मध्ये आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी महाविद्यालयाचा आदित्य रामनाथ दराडे देशात पहिला आला आहे. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या ऑनलाइन परीक्षेसाठी देशभरातून 25 हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी चार हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
नकारार्थी गुण पद्धती या परीक्षेत वापरली जाते. आदित्यला 295 गुण मिळाले आहेत. प्रचलित औषधांचे फॉर्म्युले विकसित करण्याचे काम या क्षेत्रातील संशोधक करत असतात. अशा ठिकाणी आदित्य आपली गुणवत्ता सिद्ध करेल, असा विश्वास प्राचार्य डॉ. ऋषीपाठक यांनी व्यक्त केला. आदित्यचा संस्थेचे विश्वस्त खासदार समीर भुजबळ यांनी सत्कार केला. याप्रसंगी रामनाथ दराडे, सुरेखा दराडे, विकास पानसरे आदी उपस्थित होते.