आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पदवीधर’साठी पंधरा दिवसांत अवघी हजार ४१० मतदार नोंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पळापळ झालेल्या पदवीधर मतदार नोंदणी विभागाला अद्यापही मतदारांचा प्रतिसाद मिळत नाही. पंधरा दिवस झाल्यानंतर जिल्ह्यात अवघ्या हजार ४१० मतदारांनी केवळ पदवीधरसाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, यात महिला मतदारांची संख्याही अवघी १४९५ इतकीच आहे. त्यामुळे प्रशासनाने नोंदणीसाठी मतदारांना आवाहन केले आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी जुनी यादी रद्द करत संपूर्णपणे नव्याने नोंदणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. हे आदेश निवडणूक आयोगाकडून नोंदणी यंत्रणेकडे काहीसे विलंबाने मिळाले. आयोगाने पदवीधर नोंदणी मोहिमेचा कार्यक्रम जाहीरकेल्यानंतर ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु झाली. सहाजिकच सव्वालाख नोंदणी असलेल्या मतदारांची पुन्हा नव्याने नोंदणी करण्याचे यंत्रणेसमोर आव्हान होते. प्रत्यक्षात ही नोंदणीची संख्या कमी होत साधारणत: ९० हजारावर येऊन ठेपेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र सध्याच्या स्थितीवरुन लक्षात घेतले तर पुढील १२ दिवस अजून नोंदणीची मुदत आहे. त्यात किती प्रमाणात नोंदणी होते याबाबत यंत्रणा अद्यापही साशंकच आहे. आजच्या स्थितीत हजार ४१० अर्ज आले असून हजार ३३४ अर्ज स्विकारले आहेत. त्यात मालेगावमध्ये बाह्यमध्ये ६४१, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ६४०, नाशिकमध्ये ५०३, नाशिक पश्चिममध्ये -४०७,नांदगाव - ६५, मालेगाव मध्य ३४८, बागलाण ३९०, कळवण -२७३, सुरगाणा ३४२, चांदवड-१३९, देवळा २७२, येवला - ९७, सिन्नर-४४३, निफाड-१५९, दिंडोरी ४१७, पेठ ३७, देवळाली ७१, इगतपुरी-११६, त्र्यंबक - ५० मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...