आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षनिहाय राजकारण रंगणार, पक्षाच्या चिन्हावर होणार प्रथमच लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ग्रामपंचायतीं मधून नुकत्याच नगरपंचायतींमध्ये रूपांतरित झालेल्या जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना यंदा प्रथमच अधिकृत राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढविता येणार आहे. त्यामुळे आता नगरपंचायतींच्याही निवडणुकीत पक्षनिहाय राजकारणास सुरुवात झाली असून, अनेक नवी राजकीय समीकरणेही दिसून येत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत अधिकृत राजकीय पक्षांच्या चिन्हाचा वापर उमेदवारांना करता येत नाही. त्यामुळे मतदारांना भावेल असेच चिन्ह मिळविण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू होते. शिवाय निवडणूक ही व्यक्तिकेंद्रित असते. पण, आता ही बाब जिल्ह्यात नव्याने निर्मित होऊ घातलेल्या पेठ, सुरगाणा, देवळा, चांदवड, निफाड, कळवण या सहा नगरपंचायतींना लागू होणार नाही. कारण त्यांचे नुकतेच नगरपंचायतींत वर्गीकरण झाले आहे.

साहजिकच तेथे आता राज्यातील प्रमुख पाचही पक्षांच्या उमेदवारी चिन्हांवर उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे यापूर्वीच ग्रामपंचायतींमध्ये असलेला विरोधकही आता एकाच पक्षाचा कार्यकर्ता असल्याने आपल्याच पक्षाच्या उमेदवारास मदत करण्यास प्राधान्य देत आहे. दुसरीकडे आता राज्यात कधीही पाहावयास मिळालेले गणित अर्थात राजकीय पक्षांची युती, आघाडी येथे पाहावयास मिळत असून, पेठमध्ये प्रथमच राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि सीपीएम एकत्र लढत आहेत, तर केंद्रात आणि राज्यात असलेल्या एकत्र सत्तेत असलेली शिवसेना-भाजपसह उर्वरित सर्व पक्ष स्वतंत्र लढत आहेत.

कळवणमध्ये मात्र दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र, येथे नव्यानेच कळवण विकास आघाडी अस्तित्वात आली असून, इतर राजकीय पक्ष स्वतंत्रच लढत आहेत. चांदवडमध्ये कॉँग्रेस विरुद्ध भाजप लढत होत असून, इतर पक्षांना संपूर्ण १७ जागांवर लढण्यासाठी पूर्ण उमेदवारही मिळाले नाहीत. हीच गत इतरही नगरपंचायतींमध्ये दिसत असल्याने आता निवडणुका झाल्यानंतर सत्तेसाठीही वेगळीच आघाडी अथवा युती पाहावयाची शक्यता दिसत आहे.