आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवल्यात 150 ग्रामपंचायत कर्मचा-यांचे साखळी उपोषण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला - ग्रामपंचायत पातळीवरून कर्मचा-यांचे प्रश्न सुटत नसल्याने जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सुमारे 150 कर्मचा-यांनी मंगळवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
उद्योग ऊर्जा विभाग मंत्रालय, मुंबई किमान वेतन अधिनियम 1948 अन्वये अधिसूचना 25 एप्रिल 2007 नुसार ग्रामपंचायत कर्मचा-यांना सुधारित किमान वेतन व विशेष भत्ता लागू करण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 2006 पासून तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांना सुधारित किमान वेतन व विशेष वेतन मिळणे आवश्यक होते. ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या मागण्यांसंदर्भात कुठलीही सहानुभूती दाखवली न गेल्यामुळे त्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
या वेळी जिल्हा सरचिटणीस उज्ज्वल गांगुर्डे, तालुकाध्यक्ष केशव ढमाले, उपाध्यक्ष भाऊसाहेब होंडे, रावसाहेब खोकले, दिगंबर बटवल, विलास अहिरे, चंदू फुलारे, बाळासाहेब देशमुख, हसन शेख, मच्छिंद्र देशमुख, सत्याबाई शिंदे, सुनील कोकाटे आदी सहभागी झाले होते.