आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई सफरीची आजोबांची इच्छा पूर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - आयुष्यात एकदा तरी हवाई सफर करायचीय, ही आजोबांची इच्छा नातवाने पूर्ण केली आहे. मालेगाव येथे एका विवाह सोहळ्यासाठी या नातवाने आपल्या आजोबांना चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून नेल्याचा प्रकार दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात घडला.
सटाणा तालुक्यातील लाडूद या गावात विनोद भावजी ठकारे हे युवा शेतकरी असून त्यांच्याकडे डाळिंबाच्या बागा आहेत. आधुनिक शेतीमुळे हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. त्यांच्या आजोबांनी कुटुंबयांकडे काही दिवसांपूर्वी एक इच्छा व्यक्त केली होती. जिवात जीव असेपर्यंत एकदा तरी मला हवाई सफर करायचीय, अशी त्यांची इच्छा होती. विनोद यांनी ही इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले. मालेगावात ठकारे यांच्या नातेवाइकांचा विवाह सोहळा होता. हेच औचित्य साधून विनोद यांनी मुंबईहून भाड्याने हेलिकॉप्टर मागवले व आपल्या आजोबांना, कुटुंबीयांना या विवाह सोहळ्यासाठी हवाईमार्गे नेले. विशेष म्हणजे वधू-वरांनाही या हेलिकॉप्टर सफरीचा आनंद घेता आला. आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण केल्याचा मला खूप आनंद वाटतोय, अशी प्रतिक्रिया विनोद यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मालेगावच्या कॉलेज मैदानावर जेव्हा वधू-वरांसह हेलिकॉप्टर उतरले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती.