आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिन्नरमध्‍ये मालमत्तेसाठी नातवाकडून आजीचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - आजीच्या नावावरील जमीनजुमल्यासह मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी नातवानेच आजीचा खून केल्याची घटना खोपडी (ता. सिन्नर) येथे घडली. याबाबत वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मुंबई येथील रहिवासी रमेश बाबूराव दराडे यांनी वावी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यांची आई विनूबाई बाबूराव दराडे (वय 85) या खोपडी (ता. सिन्नर) गावात खंबाळे रस्त्यावरील वसाहतीत राहतात. रमेश यांच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा स्वप्नील दराडे (रा. सिन्नर) याने आजीच्या नावावरील मालमत्तेमध्ये अर्धा वाटा मिळावा म्हणून आजीला मारहाण केली.


मालमत्तेसाठी सिन्नरजवळ नातवाकडून आजीचा खून
त्यानंतर बाहेरून कुलूप लावून तो निघून गेला. शेजारच्या लोकांनी बराच काळापासून घराला कुलूप असल्याने व आजीबाईंचाही ठावठिकाणा नसल्याने अखेरीस त्यांच्या मुलाला म्हणजे रमेश यांना फोन केला असता, सगळा उलगडा झाला. याबाबत पोलिसांनी स्वप्निलचा शोध सुरू केला आहे.