आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथोत्सवाला प्रारंभ : वाचनातून घडते सृजनशीलता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोबाइल,इंटरनेटच्या जागत वावरताना तंत्रज्ञानात पारंगत होणे आवश्यक आहे. मात्र, तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच मुलांनी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचनातूनच सृजनशीलता घडते. त्यासाठी पाल्यांमध्ये पालक, शिक्षकांनी वाचनाची आवड रुजवली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी केले.

चुंभळे सोमवारी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, माहिती जनसंपर्क महासंचालनालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आयोजित श्रीराम हायस्कूलमध्ये नाशिक ग्रंथोत्सव २०१५ च्या उद‌्घाटन सोहळ्यात बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य सचिव प्रकाश होळकर,जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, महिला बालकल्याण समिती सभापती शोभा डोखळे, समाज कल्याण समिती सभापती उषा बच्छाव, शिक्षण विभागाचे उपसंचालक भगवान सूर्यवंशी, जि.प. शिक्षण अधिकारी नवनाथ औताडे,जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आणि श्रीराम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका लता फोकणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडवी उपस्थित होते.

चुंभळे पुढे म्हणाल्या की, आपले आचरण चांगले ठेवायचे असेल, उद्याचे सृजनशील नागरिक घडवायचे असतील तर मुलांमध्ये वाचनाची निर्माण केलीच पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथ खरेदी करुन वाचनसंस्कृती अधिक विकसित करायला पाहिजे. तर बनकर म्हणाले वाचन संस्कृती जोपासण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात स्वत:पासून झाली पाहिजे. साहित्यिक ठेवा वाढला, तर चिकित्सक विचार करणयाची प्रवृत्ती मुलांमध्ये वाढीस लागेल. होळकर म्हणाले, नाशिक साहित्याची पंढरी आहे.

एकाच ठिकाणी ग्रंथसंपदा विविध पुस्तके

प्रारंभी विद्यालयाच्या आवारात ग्रंथ दिंडीचे आगमन झाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ िदंडीचे पूजन करण्यात अाले. सकाळी बघा ही िदंडी साहित्याची लावी गाेडी, अाज येथे भरले संमेलन सर्वांना प्रेमाचे अामंत्रण अशा घाेषणा देत, श्रीराम हायस्कूलपासून ग्रंथ िदंडी िनघाली. गजानन चाैक, िशवाजी चाैक, पाथरवट लेन, पंचवटी करंजा परिसरातून िदंडी मार्गक्रमण करत तिचा समाराेप श्रीराम हायस्कूलमध्ये झाला. िदंडीतील लेझीम पथक अाणि संत साहित्यिकांच्या वेशातील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत हाेते.
श्रीराम हायस्कूल येथे सुरु असलेल्या ग्रंथाेत्सव २०१५ मध्ये एकूण सात स्टाॅल लाववण्यात अाले अाहे त्यात शासन मुद्रण लेखनसामग्री प्रकाशन संचानालय माहिती जनसंपर्क संचालनालय शिक्षण उपसंचालक कार्यालय ज्याेती स्टाेअर्स वैशाली प्रकाशन अाणि एलीक एन्टरप्रायजेसचा स्टाॅल अाहे शासकीय स्टाॅलवर लाेकराज्यसह इतर पुस्तकांवर १० टक्के सवलत अाणि विश्वकाेषवर ३० टक्के सवलत देण्यात अाली अाहे.