आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: द्राक्ष व्यापाऱ्याचा मारहाणीत मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- द्राक्षाच्या पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून झालेल्या मारहाणीत द्राक्ष व्यापारी रवी वाघ यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निफडमधील उगावमध्ये ही घटना घडली आहे.याप्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत.

नातेवाईकांनी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. रवी वाघ यांच्या दोन्ही लहान मुलांसह पत्नी आणि नातेवाईक ठिय्या आंदोलन बसले आहेत. जोपर्यंत आरोपींनी अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी वाघ यांच्या नातेवाइकांनी केली आहे.
 
2 तारखेला रात्री 8 वाजता रवी वाघ यांचा बाळासाहेब ढोमसेसह पाच जणांसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यात रवी वाघ गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी साई हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, काल (6 मार्च) रात्री 8 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. 

रवी वाघ यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी येत असल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु, त्यावर काहीही कारवाई झाली नाही अशी नातेवाईकांची तक्रार आहे. या घटनेमुळे भीतीपोटी द्राक्ष व्यापारी पलायन करत असून हंगाम संकटात सापडू शकतो.
 
पुढील स्लाइडवर पाहा FIRची कॉपी....
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...