आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांना द्राक्ष झाली ‘महाग’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ग्रेपसिटी म्हणून देशात प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरातील नागरिकांनाच द्राक्ष खरेदी वाढीव दराने करावी लागत आहे. ग्राहकांपर्यंत माल पोहोचविणार्‍या व्यापार्‍यांमुळे ग्राहकांना चांगल्या प्रतीच्या व चविष्ट द्राक्षांसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने येथील ग्राहकांना द्राक्षाची चव आंबटच लागत आहे.

नाशिक जिल्हा हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र, चांगल्या प्रतीची द्राक्षे ही परदेशात किंवा परराज्यात विक्रीसाठी जातात. मात्र, नाशिक शहरातील नागरिकांना दुय्यम दर्जा असलेले द्राक्ष अधिक दराने खरेदी करावी लागत आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या शरद सिडलेस, सोनाका (व्हाईट), सोनाका (ब्लॅक), थामसन, नानासाहेब परपल, प्लेम आदी जातीचे द्राक्ष उपलब्ध आहेत. यामध्ये थामसनला कमी दर असून, नानासाहेब परपलला सर्वाधिक दर आहे.

इंधन दरवाढीचा परिणाम
द्राक्षांच्या दरवाढीमागे वाढती महागाई हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इंधनाचे दर महिन्याला वाढत असल्याने वाहतुकीत मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे किलोमागे पाच ते दहा रुपये अधिक दराने द्राक्ष विक्री करावी लागत आहे. मुज्जू सय्यद, किरकोळ विक्रेता

उत्पादन खर्चात वाढ
मजुरी, औषधे व खते यांच्या दरात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, द्राक्षांचे भाव तेच आहेत. त्यामुळे सध्याच्या दरात द्राक्ष विक्री करणे परवडत नाही. नाना सानप, द्राक्ष उत्पादक, वडगाव पिंगळा