आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिपावसाने जमिनीखाली वाढ खुंटली, थेट फांदीवर मुळ्या, द्राक्ष पंढरीला ग्रहण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिपावसामुळे द्राक्षांच्या मुळांची जमिनीखालील वाढ खुंटली असून ऑक्सिजन मिळविण्यासाठी ती अशी फांद्यांवर फुटली आहेत. - Divya Marathi
अतिपावसामुळे द्राक्षांच्या मुळांची जमिनीखालील वाढ खुंटली असून ऑक्सिजन मिळविण्यासाठी ती अशी फांद्यांवर फुटली आहेत.
निफाड- परतीच्या पावसाने सलग आठ दिवस निफाड तालुक्याला झोडपल्याने येथील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले अाहे. बागांत पाणी साचल्याने आर्द्रता वाढून मुळांची वाढ खुंटून त्यांना ऑक्सिजन मिळेनासा झाल्याने ती आता फांद्यावर फुटल्याचे दिसत आहे. घडांची वाढ थांबली असून जसजसे ऊन पडत आहे तसे घडांची कुज होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. 

गेल्यासात ऑक्टोबरपासून तर शनिवार (दि.१४) पर्यंत सलग आठ दिवस निफाड तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने येथील द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान झाले अाहे. बागांमध्ये आठ दिवस सतत पाणी राहिल्यामुळे हवेत अतिरिक्त आद्रता वाढून मुळांची वाढ खुंटून ती आता फांद्यावर फुटल्याचे दिसत आहे. त्यामुळे द्राक्ष घडाची वाढ थांबली असून जसजसे ऊन पडत आहे तसे घडांची कुज होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे दोन- चार दिवसात नुकसानीचे प्रमाण वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 
 

निफाड येथील रवींद्र फकिरा गाजरे, अंबादास विश्वनाथ कापसे, ज्ञानेश्वर फकिरा पवार (प्रत्येकी एकर), दौलत कचेश्वर खताले (दीड एकर), नंदू त्र्यंबक पडोळ ( एकर), संजय गोळे, शरद खताले (१ एकर, श्रीरामनगर), माणिकराव संपत माळोदे (४ एकर, आहेरगाव) या शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे. 

शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर 
गेल्या वर्षी द्राक्षाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. यंदा अतिपावसाने नुकसान झाले. शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. 
- राजेंद्रगाजरे, शेतकरी 

फवारणीस औषधेही मिळेना 
पावसामुळे करपा, डावणी या रोगांच्या प्रादुर्भावामुळे घड जिरणे, कुज आदी समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. फवारणीसाठी आवश्यक औषधेही मिळत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडले आहेत. 
- बाळासाहेबशेळके, द्राक्ष उत्पादक शेतकरी 

शेतकरी हतबल, शासनाने मदत करावी 
छाटणीपासून ते चाळीस दिवस झालेल्या द्राक्षबागांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. फवारणीसाठी काही शेतकऱ्यांकडे भांडवलही शिल्लक राहिलेले नसल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना आता तरी मदत करावी. 
-रावसाहेबगोळे, अध्यक्ष, निफाड तालुका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक संस्था 

सध्या द्राक्ष बागायतदारांसमोर या समस्या 
- पोंग्यात घड जिरणे 
- डावणीचा प्रार्दुभाव 
- फुलोऱ्यातील घड कुजणे 
बातम्या आणखी आहेत...