आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक परिसराज आढळला 'ग्रेट क्रेस्टेड ग्रीब' पक्षी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक परिसरात यापूर्वी नोंद न झालेला पाणखळ जागी राहणारा हा पक्षी यंदा प्रथमच नांदुरमध्यमेश्वर येथे आढळून आला. दरवर्षी रशिया-युरोपातून हिवाळ्यात उत्तर-मध्य भारतात स्थलांतर करून येणारा हा डौलदार पक्षी नाशिक परिसरात दिसल्याने निसर्ग, पक्षीप्रेमी अत्यंत आनंदित झाले आहेत. बदकाच्या आकाराच्या या पक्ष्याची मान लांब, निमुळती असून चोच काहीशी गुलाबी रंगाची असते.

डोक्यावर काळी टोपी घातल्यासारखा तुरा असतो आणि विणीच्या हंगामात यांच्या डोळ्यांच्या मागून मानेवर उतरणारी कल्ल्यांसारखी तांबूस पिसे उगवतात. मानेचा रंगदेखील तपकिरी होतो. अत्यंत डौलदार दिसणारा हा पक्षी तळी-तलाव, धरणांचं पाणी, तसेच नदीकिनार्‍यावर आढळतो. पाण्यात पोहता-पोहता मध्येच बुडी मारून हे पक्षी मासेमारी करतात. पाणवठय़ाकाठी शांत बसून यांच्या हालचालींचे निरीक्षण करणं खूप आनंददायी ठरतं.