आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरित लवादाचा आदेश हरवला धुरात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पर्यावरणाचा होणारा ऱ्हास तसेच दिवसेंदिवस ग्लाेबल वॉर्मिंगचा वाढता धाेका यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी वेळीच हालचाली हाेणे अत्यंत गरजेचे बनले अाहे. पर्यावरणाला हानी पाेहाेचवणाऱ्या नागरिकांवर कारवाई हाेणेही तितकेच गरजेचे अाहे. शासनस्तरावरून या कामी ठाेस कार्यवाही हाेणे अपेक्षित अाहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने कचरा, प्लास्टिक पिशव्या, पालापाचोळा जाळण्यावर बंदी घातली आहेे. या आदेशाची काटेकाेरपणे अंमलबजावणी हाेऊन नियमभंग करणाऱ्यांवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याचेही आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. थेट आयुक्तांनीच आदेश काढल्याने प्रभावीपणे कारवाई हाेणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र नागरिकांवर कारवाई दूरच, परंतु महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार घडत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास अाले. याबाबत अनेक भागांतील नागरिकांनी ‘डी. बी. स्टार’कडे तक्रारी केल्या असल्याने अाता या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार तरी काेण, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. देशातील १०० स्मार्ट सिटीच्या पंगतीत जाऊन बसलेल्या नाशिक शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावा, नागरिकांचे आरोग्य संवर्धन व्हावे, यादृष्टीने पालिका प्रशासन प्रयत्नरत असल्याचे सांगितले जात असताना अशा प्रकारच्या निष्काळजी कृत्याने हरित लवादाबराेबरच अायुक्तांच्या अादेशालाही डावलले जात असल्याचे बाेलले जाते.
दाेषींवर कारवाईचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना...
शहरात अस्वच्छता करणारे, कचरा जाळणारे नागरिक वा अन्य व्यक्ती यांच्याविरोधात कठाेर कारवाई करण्याचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याची नाेंदही ठेवण्याच्या सूचना अाहेत. मात्र, विभागीय अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारांकडे सोयीस्करपणे दुर्लक्षच केले जात असल्याने राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाची काटेकाेरपणे अंमलबजावणी हाेत नसल्याचेच प्रदूषणाचा वाढता अालेख कमी हाेत नसल्याचेच दिसून येत अाहे. याबाबत महापालिका आयुक्तांनीच गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या अाहेत.

मोकळे भूखंड बनले डंपिंग ग्राउंड; कचरा जाळण्याचेही प्रकार
शहरातील शरणपूररोड, पाथर्डी, मखमलाबाद, इंदिरानगर परिसरातील अनेक मोकळ्या भूखंडांना डंपिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले अाहे. या डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकून ताे जाळलाही जात असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात तर भर पडतेच आहे, शिवाय परिसरातील नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्नही डाेके वर काढत अाहे. विशेष म्हणजे, याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ‘स्मार्ट अॅप’वरही अनेकदा तक्रारी केल्या आहेत, मात्र या तक्रारींकडेही दुर्लक्षच हाेत असल्याचे अनेकांनी ‘डी. बी. स्टार’कडे सांगितले.

पालापाचोळा जाळण्याचा प्रकार
झाडांचा पालापाचोळा घेऊन जाण्यास अनेकदा घंटागाडी कर्मचारी नकार देतात. परिणामी, सफाई कर्मचाऱ्यांकडून पालापाचोळ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ताे अाहे तिथेच जाळून टाकला जातो. यामुळे प्रदूषणात माेठ्या प्रमाणावर भर पडत असून, नागरिकांच्या अनारोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होताे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांनी आदेश देऊनही कर्मचाऱ्यांकडून नियम धाब्यावर बसविला जात असून, कोणत्याही कारवाईची भीती बाळगता सर्रास कचरा, प्लास्टिक जाळण्याचे प्रकार केले जात असल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे.

कारवाईबाबत माैनच; अधिकारी अनभिज्ञच
दंडाची तरतूद असतानाही शहरात अद्यापही उघडपणे कचरा जाळला जात असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशान्वये किती वेळा अाणि काेणावर कारवाई करण्यात अाली अाहे, याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ‘माहिती घ्यावी लागेल’, ‘अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे’, ‘बघताे, सांगताे’ अशी माेहघम उत्तरे देण्यात अाली. यामुळे महापालिका प्रशासनाकडून प्रदूषण करणाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबत साशंकताच आहे.

..तरतातडीने तक्रार करावी
कोणी नागरिक अथवा महापालिकेचे कर्मचारी कचरा, प्लास्टिक, रबर आदी वस्तू जाळताना आढळल्यास त्या विरोधात सक्तीने कारवाई करण्यात येणार आहे. असे कृत्य करताना कोणी आढळल्यास त्याबाबत तातडीने विभागीय अधिकारी, स्वच्छता मुकादम, आरोग्याधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
..तर कठाेर कारवाई करणार
डॉ. विजय डेकाटे, आरोग्याधिकारी,महापालिका
ग्लाेबल वॉर्मिंगचा वाढता धाेका लक्षात घेता कचरा, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू जाळण्याबाबत निर्बंध घालण्यात अाले. यात कचरा जाळल्यास थेट हजार रुपयांचा दंड आकारण्याचे आदेशही राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. असे असताना शहरात मात्र मोकळ्या भूखंडाबराेबरच झाडांच्या बुध्यांजवळ, रस्त्याच्या कडेलाच सर्रासपणे कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पाहणी केली असता राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश बेजबाबदार नागरिकांसह आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांच्याही उदासीन वृत्तीमुळे कशाप्रकारे कचऱ्याच्या धुरात हरवताेय, याचे पुरावेही ‘डी. बी. स्टार’च्या हाती लागले अाहेत. विशेष म्हणजे, याबाबत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना कारवाईची गरजही वाटत नसून, अाजपावेताे किती वेळा कारवाई केली, हेही ज्ञात नसल्याचा धक्कादायक प्रकार समाेर अाला. पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या या प्रकारावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझोत...
िनयमांना तिलांजली देत शहरात सर्रासपणे कचरा, प्लास्टिक जाळण्याचे प्रकार, बेजबाबदार नागरिकांसह महापालिका कर्मचाऱ्यांकडूनही रस्त्याच्या कडेलाच पालापाचाेळा जाळण्याचा प्रताप; कारवाई शून्यच
{ शहरात सर्रासपणे कचरा जाळण्याचे प्रकार सुरू अाहेत. अशा व्यक्ती वा कर्मचाऱ्यांविराेधात कारवाई का केली जात नाही?
-राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार शहरात कचरा जाळण्यास बंदी आहे. कोणी नागरिक वा कर्मचाऱ्याने कायदा मोडल्यास त्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
{महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी अाहेत. काय कारण?
-कचरा जाळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याबाबत अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. त्यांना याबाबत विचारणा करावी लागेल.
{अनेकदा घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून पालापाेचाळा घेण्यास नकार दिला जातो, मग स्वच्छता कर्मचारी अाहे त्याच ठिकाणी हा पालापाचाेळा जाळतात, ज्यामुळे माेठ्या प्रमाणावर प्रदूषण हाेते. अशा स्थितीत जबाबदार काेण?
-घंटागाडी कर्मचाऱ्यांना पालापाचोळा घेण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी हाेत नसल्यास कठाेर कारवाई केली जाईल. ही बाब यापुढे गांभीर्यानेच घेतली जाईल.
बातम्या आणखी आहेत...