आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यासाठी ‘ग्रीन कॉल’उपक्रम,स्वच्छ पर्यावरणासाठी जगजागृती मोहीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराला देश- विदेशातील एक कोटींपेक्षा अधिक भाविक भेट देण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी आणि इगतपुरी ही शहरे स्वच्छ राहावी, यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, वुमन्स सोसायटी फॉर एन्व्हायर्नमेंट, कल्चर अँड एज्युकेशन यांच्याकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. शनिवारी (दि.22) प्राचार्य परिषदेने त्याचा शुभारंभ होणार आहे.
शहरांमध्ये केल्या जाणा-या सुधारणांसाठी ‘केअर नाशिक-ग्रीन कॉल’ हा उपक्रम राबवणार असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शनिवारी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही प्राचार्य परिषद होईल. ‘शिक्षणक्षेत्राची पर्यावरणासंदर्भातील भूमिका : कुंभमेळा’ या विषयावर परिषदेत उहापोह होणार आहे. सचिव चंद्रकांत दीक्षित, पदाधिकारी राजू राठी, नीलिमा पाटील, गिरीश येवला, नाशिक केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टचे अध्यक्ष गोरख चौधरी उपस्थित होते.


यांचे मिळणार मार्गदर्शन
प्राचार्यांच्या परिषदेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम, पर्यटन तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. चेंबरचे अध्यक्ष आशिष पेडणेकर अध्यक्षस्थानी असतील. शिक्षणमहर्षी सर डॉ. मो. स. गोसावी, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, मुंबईच्या पर्यावरणतज्ज्ञ सीमा रेडकर, एमआयडीसीचे सल्लागार पद्माकर नांदुस्कर मार्गदर्शन करणार असल्याचे वुमन्स सोसायटी फॉर एनव्हायर्नमेंट, कल्चर अँड एज्युकेशनच्या अध्यक्षा डॉ. धनश्री हरदास यांनी सांगितले.