आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीनगर चौकाला मिळणार झळाळी; ग्रीन स्पेसेस चौकाचे आज भूमिपूजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिका आणि क्रेडाई नाशिक यांच्या वतीने शहरातील वाहतूक बेटांचे सुशोभीकरण आणि देखभाल खासगी विकसकांकडून करण्यात येणार आहे. या बहुप्रतीक्षित प्रकल्पातील पहिल्या कृषीनगर येथील ग्रीन स्पेसेस चौकाचे भूमिपूजन महापौर अँड. यतिन वाघ यांच्या हस्ते बुधवारी (दि. 4 सकाळी 10 वाजता होत आहे.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून आयुक्त संजय खंदारे, स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष अनंत राजेगावकर, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, नगरसेविका छायाताई ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ग्रीन स्पेसेसचे संचालक किरण चव्हाण यांनी दिली. अशाप्रकारे शहरातील 31 वाहतूक बेटे, दुभाजक, चॅनलायझर विकसित केली जाणार आहेत. क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या ग्रीन स्पेसेस या बांधकाम संस्थेकडून कृषीनगर येथील चौकाचे सौंदर्य झळाळणार आहे.
कृषीनगर वाहतूक बेटाचे वैशिष्ट्य
> आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिझाइन.
> फुटपाथ व सायकलींकरिता वेगळा मार्ग.
> माहितीफलक, बेंचेस व डस्टबिन्स.