आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिकरोड - प्रभाग 33 मधील जेलरोडवरील छत्रपती चौक (सैलानीबाबा) ते दसक दरम्यानच्या रस्ता दुभाजकात सुपारी, पाम जातीच्या 325 वृक्षांचे सोमवारी महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्या हस्ते रोपण करण्यात आले. या वृक्षांना ठिंबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असून, पालिका कार्यक्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग आहे.
सन 2003च्या सिंहस्थापूर्वी नागपूर पॅटर्ननुसार जेलरोड परिसरातील या मुख्य रस्त्याची बांधणी झाली. प्रशस्त रस्त्याच्या दुभाजकात उगवलेल्या गाजर गवतासह अन्य झुडपांमुळे विद्रुपीकरण होत असल्याने नगरसेवक अशोक सातभाई यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन लाख रुपये खर्चाने हा उपक्रम राबवण्यात आला.
प्रत्येकी पाच फूट अंतरावर वृक्षारोपण केले असून, पाच ठिबकांद्वारे प्रत्येक झाडास पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आली आहे. तासाला आठ लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे. वीज आणि पाण्याची व्यवस्था सातभाई यांच्या निवासस्थानातून केली आहे. पालिकेचे अधिकारी नीलेश साळी, विवेक गरूड, प्रमोद साखरे, किशोर जाचक व नागरिक उपस्थित होते.
राजराजेश्वरी मंगल कार्यालयालगत बारा एकरात म्हैसूरच्या धर्तीवर गार्डन उभारण्याचा तत्कालीन नगरसेवक प्रकाश बोराडे यांच्या प्रस्तावावर गेल्या सात वर्षांत कार्यवाही झालेली नाही. आयुक्तांनी या जागेचीही पाहणी केली. सातभाई यांनी सादर केलेल्या सुधारित प्रस्तावाबाबत आयुक्तांनी सकारात्मक संकेत दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.