आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकीचा हिसका; अखेर डीजेवाल्या नानांची घरापासून ते पाेलिस ठाण्यापर्यंत ‘मिरवणूक’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गणेश विसर्जन मिरवणुकीत हायकाेर्टाच्या अादेशाचे उल्लंघन करीत डीजेचा दणदणाट करणारे राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते गजानन शेलार यांना अखेर तीन दिवसांनंतर भद्रकाली पाेलिसांनी ताब्यात घेत त्यांचे घर ते पाेलिस ठाण्यापर्यंत पायी नेत जणू ‘मिरवणूक’च काढली. तीन तास शेलारांची चाैकशी करून अटकेची तयारी केली परंतु त्यांना तात्पुरता जामीन मिळाल्याने साेडण्यात अाले. दरम्यान, कायद्याला अाव्हान देण्याची भाषा करणाऱ्यांवर कशी कारवाई हाेते याचा संदेश यातून भद्रकाली पाेलिसांनी दिला. 

महाराष्ट्रातच नव्हे देशभरात डीजेद्वारे हाेणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा गाजत अाहे. न्यायालयानेही अावाजावरील निर्बंधावर बाेट ठेवत उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे कठाेर निर्देश दिले अाहे. याच पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पारंपरिक वाद्य वाजवण्याचे मंडळांना आवाहन केले हाेते. विशेष म्हणजे, त्यास बहुतांश मंडळांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. मात्र, राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शेलार यांच्या दंडे हनुमान मित्रमंडळाने पाेलिसांना खुले अाव्हान देत डीजे लावला. परिणामी, या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या शेलार यांच्यासह पुतण्या राहुल ऊर्फ बबलू शेलार, योगेश मदरेले, अक्षद कमोद, गणेश तोरे यांच्याविरोधात ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. यात गजानन शेलार वगळता चौघांना पोलिसांनी अटक केली. तिकडे, शुक्रवारी (दि. ८) अटक टाळण्यासाठी शेलार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शेलार यांच्यासह चौघांना सोमवारपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला. मात्र पोलिसांपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्याने भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी शेलार यांच्या घरी धडक दिली. 

कायद्यापुढे काेणी माेठे नाही; म्हणून नेले पायी 
कायद्याचाप्रत्येकानेसन्मान करावा असे अपेक्षित अाहे. शेलार यांना म्हणूनच घरातून ताब्यात घेत पाेलिस ठाण्यापर्यंत अाणण्यात अाले. त्यांच्या जामिनाची प्रत प्राप्त झालेली नव्हती. ती प्राप्त झाल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात अाली. दरम्यान, जामीन अर्जाविराेधात अपील केले जाणार अाहे. 
- मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे 

‘दिव्य मराठी’ची भूमिका महत्त्वाची 
ध्वनिप्रदूषणाबाबत‘दिव्यमराठी’ने प्रभावी जनजागृती केली. हायकाेर्टाच्या अादेशाची माहिती दिली. एक मंडळ वगळता सर्वांनी पारंपरिक वाद्याचा वापर केला. डीजे लावण्यास चिथावणी देणाऱ्यांवर कारवाई केली. 
- लक्ष्मीकांत पाटील, पाेलिस उपआयुक्त 

काजीपुऱ्यातून मिरवणूक; बघ्यांची गर्दी 
एरवीगंभीर खटल्यातील गुन्हेगारांची पायी वरात करून पाेलिस कायद्याला अाव्हान देणाऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करतात. मात्र अलिकडेच कळीचा मुद्दा बनलेल्या ध्वनिप्रदूषणासारख्या गुन्ह्यातही पाेलिसांनी अाता अशीच तत्परता दाखवत शेलार यांची सकाळी ११.४० वाजता काजीपुरा येथील घरापासून पाेलिस ठाण्यापर्यंत मिरवणूक काढली. यावेळी शेलार यांना बघण्यासाठी परिसरात माेठ्या प्रमाणात गर्दी जमली हाेती. कायदा हातात घेणारा काेणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असा मार्मिक इशाराच या कारवाईतून पोलिसांनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...