आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनियांच्या वाढदिवशी गटबाजीचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा साेनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेसच्या अाजी-माजी अध्यक्षांनी वेगवेगळे कार्यक्रम साजरे केल्याने पक्षातील गटबाजीचे दर्शन घडले. त्यात अाेबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी अाघाडी घेतल्याने त्यांच्यातील वादही लपून राहिला नाही. यावरून अागामी काळात पुन्हा एकदा प्रभारी विरुद्ध माजी पदाधिकाऱ्यांमधला वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली अाहेत.
माजी शहराध्यक्ष अॅड. अाकाश छाजेड यांनी दाेन दिवसांपूर्वीच वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाची घाेषणा केली. या कार्यक्रमास प्रदेश नेते संजय चाैपाने यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियाेजनही केले. त्यानुसार, अाधाराश्रमात लहान मुलांना उबदार कपडे मिठाई वाटप करण्यात अाली. सरचिटणीस याेगिता अाहेर, नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका समिना मेमन, कन्हय्या साळवे, सुनील अाव्हाड, अाेबीसी अाघाडीचे रामप्रसाद कातकाडे अादी उपस्थित हाेते. दरम्यान, छाजेड यांच्या कार्यक्रमाची वेळ समजताच त्यांच्यावर कुरघाेडी करण्यासाठी अाेबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग बाेडके यांनी स्वतंत्र कार्यक्रमाचे अायाेजन केले.
कार्यक्रमास प्रभारी शहराध्यक्ष शरद अाहेर यांना निमंत्रित करून बालसुधारालय गृहात मिठाई वाटप करण्यात अाली. या प्रसंगी माजी मंत्री डाॅ. शाेभा बच्छाव, हेमलता पाटील, नगरसेविका वत्सला खैरे, विमल पाटील, अण्णा पाटील, लक्ष्मण मंडाले, वसंत ठाकूर, मुन्ना ठाकूर अादी उपस्थित हाेते.
विशेष म्हणजे, बाेडके यांच्या कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्यांनी छाजेड यांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. तर, छाजेड यांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावलेल्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी प्रभारींच्या कार्यक्रमाला दांडी मारली. एकीकडे लाेकसभा,विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाने पक्षात मरगळ अालेली असतानाच पुन्हा छाजेड यांच्या कार्यकाळात झालेल्या प्रतिकाँग्रेसचे पेव निर्माण झाल्यास पक्षाची वाटचाल काेणत्या दिशेने हाेईल, असा सवाल खुद्द निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात अाहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा साेनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालसुधारालयात प्रभारी शहराध्यक्ष शरद अाहेर यांच्या उपस्थितीत मिठाईचे वाटप झाले. तर, अाधाराश्रमात माजी शहराध्यक्ष अॅड. छाजेड यांनीही मिठाई वाटली.