आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुप्रतिक्षित ‘जीएसटी’च्या मंजुरीचे व्यापारी-उद्याेजकांकडून उत्स्फूर्त स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बहुप्रतिक्षीत जीएसटी अर्थात एकत्रित कर प्रणालीला बुधवारी राज्यसभेने दिलेल्या मंजुरीचे शहरातील उद्याेजक-व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत हाेत अाहे.

या करप्रणालीमुळे राज्या-राज्यातील उद्याेगांना ‘एक देश एक कर’ अाकारला जाईल आणि त्यातून निकाेप स्पर्धा हाेवू शकेल. ज्या स्पर्धेचा थेट फायदा ग्राहकांना हाेईल. त्याचबराेबर वेगवेगळ्या करांपाेटी अाज करावव्या लागणारे वेगवेगळ्या अॅसेसमेंटची कटकटदेखील संपेल करप्रणालीत सुटसुटीतपणा येणार आहे. याच कारणामुळे जीएसटीचे स्वागत उद्याेजक व्यापाऱ्यांनी केले अाहे. यापूर्वी मुल्यवर्धीत कर अाला तर इतर कर नसतील असे सांगितले गेले हाेते पण तसे प्रत्यक्षात झाले नाही. त्यामुळेच स्थानिक संस्था करांचाही समावेश जीएसटीमध्येच असायला हवा तरच ताे चांगला असल्याचा सावध पावित्र व्यापारी प्रतिनिधींनी घेतला अाहे. उद्याेजक-व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या भावना त्यांच्याच शब्दात...

स्थानिक संस्था करांचाही समावेश हवा
या करप्रणालीचे अाम्ही स्वागत करताे. कारण त्यामुळे इतर करांच्या कटकटीतून सुटका होईल. फक्त स्थानिक संस्था कर वेगळे भरायला लागायला नकाेत. कारण, त्याचा फटका ग्राहकांनाच बसेल. तसे असेल तर अाम्ही विराेध करू. -प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य िकराणा घाऊक व्यापारी संघटना

स्पर्धा साेपी हाेईल कटकटही मिटेल
अाम्ही या करप्रणालीचे स्वागतच करताे. या करामुळे अाता एक देश, एक कर असेल. त्यामुळे काेणत्याही राज्यातील उद्याेगांशी स्पर्धा साेपी होईल. स्पर्धात्मक दर सर्वांना िमळतील चांगली उत्पादने ग्राहकांपर्यंत पाेहाेचू शकतील. पण ही करप्रणाली अाल्यावर कराचे दर काय असतील? याबाबत उत्सुकता अाहे. विविध करांपाेटी कागदपत्रांची करावी लागणाऱ्या जुळवणीच्या कटकटीपासून मुक्तता िमळेल. स्थानिक संस्था कर मात्र यात समाविष्ट असावा. -राजेंद्र अहिरे, अध्यक्ष, अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन

उद्याेगक्षेत्रात अानंदाचे वातावरण
जीएसटीमुळे अाता‘मेक इन इंडिया’ ‘मेक इन महाराष्ट्र’ संकल्पना प्रत्यक्षात अाणणे सुलभ होईल. विदेशी गुंतवणूकही वळविणे साेपे होईल. करावर कर नसल्याने व्यापारी, उद्याेजकांप्रमाणेच सामान्यांचाही फायदा हाेवू शकेल. सरकारी यंत्रणांचे ब्लॅकमेलिंग कमी हाेईल. -प्रदिप पेशकार, प्रदेशाध्यक्ष, भाजपा उद्याेग अाघाडी

जीएसटी उत्तम स्वागतार्हदेखील
जीएसटी चांगला टॅक्स रिफार्म म्हणावा लागेल. भारतातील करप्रणाली अर्थशास्त्र अत्यंत चांगले अाहे. अगदी विकसित देश म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या काेरियाने अापल्या पंचवार्षिक याेजनेची काॅपी केली ती योजना यशस्वीपणे राबविलीही. अापण मात्र अाहे तेथेच अाहाेत त्यामुळे जीएसटीला मिळालेल्या मंजूरीने अाम्ही अानंदीत अाहाेत. हा अत्यंत महत्वाचा निर्णय अाहे. -हरिशंकरबॅनर्जी, अध्यक्ष, निमा
बातम्या आणखी आहेत...