आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी पुरवठा संकल्पनेवर लागू; तीन कायद्यांत विभाजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जीएसटीअंतर्गत अाकारला जाणारा कर हा ‘पुरवठा’ या संकल्पनेवर लागू होणार आहे. तसेच, जीएसटी हा कर सीजीएसटी (केंद्राचा वस्तू सेवाकर), एसजीएसटी (राज्याचा वस्तू सेवाकर) आयजीएसटी (एकात्मिक वस्तू सेवाकर) अशा तीन कायद्यात हा कर विभागाला गेला असल्याचे प्रतिपादन विक्रीकर सहअायुक्त सुमेरकुमार काले यांनी केले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या वस्तू सेवाकर या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत काले मार्गदर्शन करीत हाेते.
जीएसटीविषयी सविस्तर माहती देताना काले म्हणाले की, केंद्रीय उत्पादन शुल्क, उत्पादन शुल्क (औषधी आणि प्रशासन सामग्री), अतिरिक्त उत्पादन शुल्क (विशेष महत्त्वपूर्ण वस्तूंसाठी), अतिरिक्त उत्पादन शुल्क (वस्र वस्रोद्योग), अतिरिक्त उत्पादन शुल्क, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (एसएडी), सेवाकर, वस्तू सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित असलेला केंद्रीय अधिभार आणि उपकर यांसारख्या केंद्र सरकारच्या करांचा समावेश अाहे. तर, जीएसटीमध्ये राज्य सरकारचे राज्य मूल्यवर्धित कर, केंद्रीय कर विक्री, ऐषाराम कर, प्रवेश कर (सर्व प्रकारचे), जसे की जकात, स्थानिक संस्था कर, करमणूक आणि मनोरंजन कर (अपवाद-स्थानिक संस्थांकडून आकारला गेलेला), जाहिरातीवरील खरेदी कर, लॉटरी, बेटिंग आणि जुगारावरील कर, वस्तू सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित असलेला राज्य अधिभार आणि उपकर यांसारख्या करांचा समावेश असेल, असे काले यांनी स्पष्ट केले.

प्रथम सत्रात मुंबई येथील तज्ज्ञ जयेश गोगरी यांनी जीएसटी कायद्याचे विश्लेषण करताना या कराकरिता २० लाखांची मर्यादा असल्याने २० लाखांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना ताे लागू होणार नसल्याचे सांगितले. नरेश शेठ, भरत शेमलानी, अाशिष केडिया यांनी जीएसटीविषयी माहिती दिली. सचिव मिलन लुणावत यांनी सूत्रसंचालन केले आभार मानले.
{ जीएसटीसाठीची नोंदणी ऑनलाइन हाेईल आणि कर प्रशासनाकडून तीन दिवसांत अर्जदारास अर्जातील कमतरता कळविली नाही तर तो अर्ज योग्य आहे, असे समजून नोंदणी दिली जाईल.

{ जीएसटीबाबत करदात्याने स्वत:ची निर्धारणा स्वत: करून देय कराचा भरणा शासनाच्या खात्यावर जमा करावा. करदात्याने दाखल केलेले विवरण त्याने स्वत: निर्धारित केल्याचे समजले जाईल.

{ इंटरनेट बँकिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जीएसटी कराचा भरणा करावा. छोट्या करदात्यांना इलेक्ट्राॅनिक माध्यमातून तयार करण्यात आलेल्या चलनाद्वारे बँकेमध्ये जाऊन कर भरणा करता येईल.
बातम्या आणखी आहेत...