नाशिक - साधू-महंतांचे काम ध्यानधारणा, साधना, तपस्या करण्याचे असून, ते त्यांनी करावे, उगाचच काँग्रेसच्या काळात काय होते, भाजप सरकारच्या काळात काय झाले, कोणता पक्ष चांगला, कोणता वाईट या भानगडी करून राजकारणात पडू नये, असा टोला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनविारी साधूंना लगावला. साधुग्रामच्या पाहणी दौऱ्यात महाजन यांना पत्रकारांनी काही साधू-संत भाजपचे सरकार असतानाही कुंभमेळ्यासाठी पुरेशा सुविधा दिल्या गेल्या नाहीत, असा आरोप करीत असून, या सरकारपेक्षा पूर्वीचे काँग्रेसचे सरकार चांगले होते, असे आरोप करीत असल्याबाबत छेडले असता त्यांनी हा टोला लगावला. यामुळे मात्र आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री महंत हरीगिरी महाराज यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांसह थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. जो पालकमंत्र्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले. भाजपचीच सत्ता गल्लीपासून उर्वरित.पान १० दिल्लीपर्यंत असून, प्रशासन, राज्य केंद्र सरकार सगळ्यांनीच या कुंभमेळ्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. मागील कुंभमेळ्यासाठी जी जागा उपलब्ध होती, त्यापेक्षा जास्त म्हणजे ३००-३५० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे, मागील कुंभमेळ्यासाठी अवघे ३००-३५० कोटी रुपये दिले गेले होते. मात्र, आता त्याच्या आठपट जास्त म्हणजे २५०० काेटी रुपये देण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर असो की, नाशिक दोन्ही शहरांतील रस्ते, घाटबांधणीमुळे शहरांचा चेहराच बदलला गेला असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले