आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी झटकले हात, मुख्यमंत्र्यांनी तोडला संपर्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापौरांनी रविवारी रात्री आंदोलनासाठी मोजकेच लोक होते, पण आज पाणी सुरूच ठेवले तर उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधून आंदोलक अन्य माहिती दिल्यावर त्यांनी पाणी थांबवण्याबाबत आता फक्त मुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतील, असे सांगत हात झटकले. त्यामुळे पालकमंत्र्यांचा धिक्कार करीत जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर कुशवाह यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. राजशिष्टाचाराप्रमाणे थेट मुख्यमंत्र्यांना मोबाइलवर फोन करता येणार नाही, अशी अडचण त्यांनी सांगितली. जाधव कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशीसंपर्क साधला असता, त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे सांगत आता बोलता येणार नाही, असे सांगितल्यानंतर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त जगन्नाथन, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी शासनाला अहवाल पाठवून स्थगितीबाबत पाठपुरावा करू, असे सांगितले. प्रशासनाला हालचालींसाठी अवधी दिला तर तोडगा निघेल, अन्यथा कायदा हातात घेऊन फायदा होणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगताच त्याप्रमाणे एक दिवस वाट बघण्याचा निर्णय झाला.
बातम्या आणखी आहेत...