आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Ready To Increase Water Reservation

पालकमंत्री नाशिकचे पाणी अारक्षण वाढवण्याच्या तयारीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद करण्याचा फटका भाजपला बसणार, ही बाब हेरून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एकलहरेसाठी राखीव ३०० दशलक्ष घनफूट पाणी नाशिक महापालिकेला वाढीव अारक्षणाच्या रूपाने देण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त अाहे. या वाढीव अारक्षणामुळे एक महिन्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असला तरी ४९ दिवसांचा तुटवडा लक्षात घेत १९ दिवसांच्या पाण्याचा प्रश्न कायम राहणार अाहे.

गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर नाशिक महापालिकेच्या पाणी अारक्षणात माेठी घट झाली. ४५०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी असताना पालिकेच्या पदरात जेमतेम हजार दशलक्ष घनफूट पाणीच उपलब्ध झाले. मात्र, यापैकी जेमतेम २७०० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरण समूहातून उपलब्ध हाेणार असून, त्याचाच खराेखर वापर हाेईल, असे सत्ताधारी मनसे-अपक्षांचे म्हणणे अाहे. दारणा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार असून, त्यापैकी हातात १५० दशलक्ष घनफूटच पाणी पडेल, असाही युक्तिवाद केला जात अाहे. दरम्यान, जानेवारीच्या सुरुवातीला पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महापाैर अशाेक मुर्तडक यांना दिलेल्या अाकडेवारीनुसार दरराेज ३५० दशलक्ष लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा सुरूच राहिला तर ३१ जुलैच्या डेडलाइनचा विचार करता जवळपास ४९ दिवसांचे पाणी कमी पडणार असल्याचे समाेर अाले हाेते. म्हणजेच जूनच्या उत्तरार्धात पाणी संपेल, अशी स्थिती हाेती. या पार्श्वभूमीवर अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले तरी १९ दिवसांच्या पाण्याचा प्रश्न हाेता. दाेन दिवस पाणी बंद ठेवले तर सप्टेंबरपर्यंत पाणी पुरणार हाेते. अाठवड्यातून एक दिवस म्हणजेच मंगळवारी पाणी बंदचा महापाैरांनी निर्णय घेतल्यानंतर २६ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी हाेणार हाेती. मात्र, या नामुष्कीचा फटका भाजपला बसेल, या भीतीतून कपातीला ब्रेक लावल्याचे सांगितले जाते. गेल्या अाठवड्यात नानाविध ठाेकताळे अाखून पाण्याचा ३१ जुलैपर्यंत कसा वापर करता येईल, याची चाचपणी करण्यात अाली. त्यातून अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही समाेर अाल्याचे सांगितले जाते. मात्र, एकलहरेसाठी अारक्षित ३०० दशलक्ष घनफूट पाणी महापालिकेला दिले तर एक महिन्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, यादृष्टीने चाचपणी सुरू झाल्याचे सांगितले जाते. यापूर्वी हीच मागणी महापाैर उपमहापाैरांनीही केली हाेती. शहरातील पाणी वापरून पुन्हा गाेदावरीतच साेडले जात असल्यामुळे एकलहरेला अडचण येणार नाही, असाही युक्तिवाद हाेता.

कपात वाढवणे अटळच
नाशिककरांमध्ये पाणी बचतीबाबत पुरेशी जागृती करण्यात महापालिकेला यश अालेले नाही. नगरसेवक वा लाेकप्रतिनिधी त्याबाबत सुस्तच असल्याचे चित्र अाहे. पाण्याची उधळपट्टी राेखण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांकडून पाहिजे तशी कारवाई झालेली नाही. एक महिन्याचे पाणी उपलब्ध झाले तरी उर्वरित १९ दिवसांचा प्रश्न असून, त्यासाठी जवळपास २०० दशलक्ष घनफूट पाणी लागणार अाहे. या पार्श्वभूमीवर अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे पाणीपुरवठा विभागातील सूत्रांचे म्हणणे अाहे.

१९ दिवसांचा प्रश्न
सध्या राेज १२.३५ दशलक्ष लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असून, ३०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध झाले तर महिन्याचा प्रश्न सुटू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. तरीही १९ दिवसांचा पाण्याचा प्रश्न कायम राहील.